आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: वयाच्या चौथ्या वर्षापासून गातेय श्रेया, एका गाण्यासाठी घेते 7 लाख रुपये मानधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल अलीकडेच तिचा बालपणीचा मित्र शिलादित्यसोबत लग्नगाठीत अडकली. शिलादित्य हिपकॅस्क.कॉमचा सर्वेसर्वा आहे. गेल्या वर्षी त्याने श्रेयाला प्रपोज केले होते आणि तिने लगेच होकार कळवला होता.
श्रेयाविषयी सांगायचे म्हणजे तिचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमधील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. श्रेयाने राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय अनेक अवॉर्ड्स तिने आपल्या नावी केले आहेत. इंडस्ट्रीशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया एका गाण्यासाठी सात लाखांच्या घरात मानधन घेते. याशिवाय आपल्या ग्रुपसोबत एक स्टेज शो करण्यासाठी ती 25 लाख रुपये घेते.
जाणून घेऊया श्रेयाविषयी बरेच काही...
वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरु केली गायन...
श्रेया घोषालने आपल्या सिंगिंग टॅलेंटच्या बळावर जगभरात नाव कमावेळ आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली हे फार कमी जणांना ठाऊक आहे. आईच तिची पहिली गुरु आहे. एका वार्षिक स्नेहसंमेलनात श्रेयाने तिचा पहिला लाईव्ह परफॉर्मन्स दिला. वयाच्या सहाव्या वर्षी श्रेयाने हिंदुस्थानी क्लासिक म्युझिकचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. पद्मश्री स्व. कल्याणजी आणि स्व. मुक्ता भिडे यांच्याकडून तिने संगीताचे शिक्षण घेतले होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या श्रेयाशी निगडीत आणखी काही खास गोष्टी...