आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शिवाजी: द बॉस\' चित्रपटासाठी रजनीकांतला मिळाले होते 26 कोटींचे मानधन, जाणून घ्या FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता रजनीकांत)

मुंबईः
सुपरस्टार रजनीकांत बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडट्रीमध्ये मागील 40 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचे वय जरी वाढत जात असले, तरी त्यांच्या कामाचा जोश काही कमी झालेला नाही. 12 डिसेंबर 2014 ला रजनीकांत यांचा 64 वा वाढदिवस आहे. त्यासोबतच हा दिवस याकरीताही विशेष आहे, कारण याच दिवशी त्यांचा आगामी चित्रपट 'लिंगा' प्रदर्शित होतोय.
12 डिसेंबर 1950 ला जन्मलेले रजनीकांत वयाच्या या टप्प्यावरही असे कारनामे करत आहेत, जे एका 18 वर्षाच्या तरूण हिरोलाही करणे अशक्य आहे. त्यांचे स्टंट लोकांना खुपच आवडतात. रजनीकांत हे खुपच मोठे आणि श्रीमंत अभिनेते आहेत, मात्र त्यांचे सुरूवातीचे आयुष्य अत्यंत अडचणीतून गेले आहे. रजनीकांत यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे, तसेच भारत सरकारनेही त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
रजनीकांत यांनी तमिळ चित्रपट 'अपूर्व रागंगल' (Apoorva Raagangal)या चित्रपटातून 1975 मध्ये आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली. हा चित्रपट 18 ऑगस्ट 1975 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कमल हासन आणि श्रीविद्या यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
रजनीकांत यांच्या वाढदिवस आणि 'लिंगा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रजनीकांत यांच्या जीवनातील काही FACTS सांगणार आहोत. हे FACTS आतापर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नसतील.
2007 मध्ये आलेला रजनीकांत यांचा चित्रपट 'शिवाजी: द बॉस' साठी त्यांना 26 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. विशेष म्हणजे रजनीकांत यांचा हा चित्रपट इंग्लंड आणि साऊथ अफ्रीकामधील बॉक्स ऑफिसवर रिलिज होणाऱ्या टॉप-10 चित्रपटांमध्ये आहे.
असेच काही आकर्षक Facts जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील लिंकवर...