आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FAMINA MISS INDIA 2014: Koyal Rana Crowned In Miss India 2014

Miss India 2014:कोयल राणाने मारली बाजी, स्टार्सच्या हजेरीत रंगला सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फॅशन विश्वात मानाच्या मानल्या जाणार्‍या ’फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2014’ या चुरशीच्या स्पर्धेत जयपूरच्या कोयल राणा हिने बाजी मारली. त्यापाठोपाठ मुंबईच्या झटालेखा मल्होत्रा आणि गोव्याच्या गेल डिसिल्व्हा यांनी यश मिळवले. गतविजेत्या ’फेमिना मिस इंडिया’ नवनीत कौर ढिल्लोने कोयल राणाला मिस इंडिया वर्ल्डचा मुकूट घातला.
अंधेरीतील यशराज स्टुडियोमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. मिस इंडिया वर्ल्डची ही 51वी स्पर्धा आहे.
यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी कोयल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी कोयलने 2008मध्ये मिस इंडिया टीनचा किताबही पटकावला होता.
या सोहळ्यात बी टाऊनचे तारे-तारका सहभागी झाले होते. श्रद्धा कपूर, शाहिद कपूर, मिकासिंग, हनी सिंह यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी सोहळ्याला चारचाँद लावले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या शानदार सोहळ्याची खास क्षणचित्रे....