आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Famous Child Artists Who Flop As Actor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 Celebs: बालपणी होते हिट, मोठेपणी बॉलिवूडमध्ये मिळाली नाही खास ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः उर्मिला मातोंडकर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बॉलिवूडमधील निवडक कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरची सुरुवात केली. 1981मध्ये उर्मिला पहिल्यांदा श्याम बेनेगल यांच्या 'कलयुग' या सिनेमात झळकली होती. त्यावेळी तिचे वय केवळ सात वर्षे होते. तिला खरी ओळख शेखर कपूर यांच्या 'मासूम' या सिनेमाद्वारे मिळाली. 1983मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात तिने नसीरुद्दीन शाह यांची मुलगी पिंकीची भूमिका साकारली होती.
लीड अॅक्ट्रेसच्या रुपात 'नरसिंहा' हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. अभिनेता सनी देओलसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर उर्मिला रंगीला(1995), चमत्कार(1992), जुदाई(1997), सत्या(1998), खूबसूरत(1999), जानम समझा करो(1999), पिंजर(2003) यांसारख्या हिट सिनेमांमध्ये झळकली. मात्र आता तिच्या करिअरला उतरती कळा लागली आहे. हा निवडक हिट सिनेमे दिल्यानंतर उर्मिला आता सिनेसृष्टीपासून दूर आहे.

उर्मिलाप्रमाणेच आणखी काही बालकलाकार आहेत, जे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून हिट आणि मोठे झाल्यानंतर फ्लॉप ठरले आहेत. काही स्टार्सनी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावले होते. परंतु हिंदी सिनेमांमध्ये ते फ्लॉप ठरले.

एक नजर टाकुया, अशाच काही स्टार्सवर...