आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Tv Serial Mahabharat Director Ravi Chopra Passes Away

प्रख्यात दिग्दर्शक रवी चोप्रा काळाच्या पडद्याआड, आज घेतला अखेरचा श्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'महाभारत' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे आज (12 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजता निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या कर्करोगाने गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होती. अलीकडेच प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रवी चोप्रा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बी. आर. चोप्रा यांचे चिरंजीव आणि यश चोप्रा यांचे पुतणे होते. त्यांनी जमीर (१९७५), द बर्निंग ट्रेन (१९८०), मजदूर (१९८३), दहलीज (१९८६), बागबान (२००३) आणि बाबुल (२००६) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय ' भूतनाथ ' आणि 'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली.
पुढे पाहा, रवी चोप्रा यांची काही छायाचित्रे...