आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fan Jumped On Hrithik Roshan Of 'Bang Bang' Screening

एका क्रेजी चाहत्याने हृतिकवर मारली उडी, बॉडीगार्डने सांभाळले, पाहा घटनेची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशनवर उडी घेताना एक चाहता)
मुंबईः आपल्या आवडत्या स्टार्सना जवळून पाहण्याची, त्यांना भेटण्याची चाहत्यांची इच्छा
असते. सेलिब्रिटींना जवळून बघण्यासाठी कधी कधी हे चाहते क्रेझी होतात. असेच काहीसे 'बँग बँग' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी घडले. बुधवारी मुंबईतील जुहू स्थित पीव्हीआरमध्ये हृतिक रोशनच्या 'बँग बँग' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी एका चाहत्याने उडी मारुन हृतिकला पकडले.
सविस्तर वृत्त असे, की बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास सिनमाचे स्क्रिनिंग आटोपल्यानंतर हृतिक थिएटरच्या पाय-यांवरुन खाली उतरत होता. त्याचवेळी एका चाहत्याने तेथे उडी मारुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तो चाहता ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसत होता. तो एका नवरात्री डांडिया ग्रूपचा सदस्य दिसत होता. त्या तरुणाने उडी मारताच हृतिक खाली पडला. त्याची कॅपसुद्धा डोक्यावरुन सरकली होती. या घटनेनंतर हृतिक शांतच दिसला. मात्र त्याच्या बॉडीगार्ड्सनी त्या तरुणाला पकडले. घटनेनंतर हृतिक शांतपणे तेथून निघून गेला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या घटनेची छायाचित्रे...