आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फॅंड्री’ची उंच भरारी, ठरला देशभरात रिलीज होणारा पहिला मराठी सिनेमा, दिवसाला होणार 550 शोज्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रसिक प्रेक्षक दर्जेदार आणि आशयघन कलाकृतींना नेहमीच भरभरून प्रेम देतात हे ‘फॅंड्री’ या चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा सिद्ध झालं आहे. 14 फेब्रुवारीला महाराष्ट्रभर 163 चित्रपटगृहांत झळकलेल्या ‘फॅंड्री’ला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूरसह अनेक ठिकाणी हाउसफुल्लचे बोर्ड दिमाखदारपणे झळकवणा-या ‘फॅंड्री’च्या चित्रपटगृहांच्या यादीत 100ची भर पडली असून तो आता 270चित्रपटगृहात दाखवला जाणार आहे. दर दिवसाला होणा-या 273 शोज् मध्येही वाढ झाली असून आता ‘फॅंड्री’चे दररोज 550शोज् होणार आहेत.
याशिवाय येत्या 28 फेब्रुवारीपासून ‘फॅंड्री’ दिल्ली, हैदराबाद, इंदौर, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, बडोदा आणि कोलकाता या शहरांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अशा प्रकारे देशभरात प्रदर्शित होणारा ‘फॅंड्री’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...