आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय-अतुलच्या संगीताने सजलं \'फँड्री\'चं थीम साँग, पाहा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी संगीतक्षेत्रातील आजची आघाडीची जोडी म्हणजे अजय-अतुल. मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या संगीताचं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर अजय-अतुलने बॉलिवुडमध्ये दिमाखदारपणे एन्ट्री केली. ‘सिंघम’, ‘अग्निपथ’ आणि इतर काही चित्रपटांमधून आपल्या संगीताच्या जादूने धमाका केल्यानंतर अजय-अतुल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलेच गर्क झाले मात्र संगीतरसिक मराठी चित्रपटात अजय-अतुलची जादू पुन्हा कधी अनुभवायला मिळणार यासाठी आतूर होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे कारण अजय-अतुलने आपल्या चाहत्यांसाठी आणलं आहे मराठी मातीतील एक अस्सल मराठमोळं गाणं.
एस्सेल व्हिजनच्या आगामी ‘फँड्री’ या महत्वाकांक्षी चित्रपटासाठीचं हे खास थीम साँग घेऊन अजय-अतुल तब्बल दोन वर्षांनी मराठीत अवतरत आहेत. विशेष म्हणजे हे गाणं स्वतः अजय गोगावले याने लिहिलं असून त्याच्याच आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. निलेश नवलाखा यांच्या नवलाखा आर्ट्स आणि विवेक कजारिया यांच्या होली बसीलची निर्मिती असलेल्या ‘फॅंड्री’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे.
अजय-अतुलच्या या नव्या गाण्याविषयी जाणून घेण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...