आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FANDRY Won Best Feature Film In Indian Film Festival Of Los Angeles

'फँड्री'च्या शिरपेचात मानाचा तुरा, अमेरिकेत सिनेमाचा गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' या सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सिनेमाला बेस्ट फीचर फिल्म म्हणून इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलिसमध्ये गौरवण्यात आले आहे. मराठीतल्या या सिनेमाने भारतीय सिनेसमीक्षकांकडून पसंतीची दाद मिळवली आहे. आता अमेरिकेतही या सिनेमाला गौरवण्यात आल्याने नागराज मंजुळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागराज यांनी आपला आनंद सोशल नेटवर्किंग साईट्स फेसबुकवर व्यक्त केला आहे. फेसबुकवर त्यांनी आपले पुरस्कारासोबतचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पौगंडावस्थेतल्या मुलाची ही प्रेमकहाणी आहे. सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात आणि किशोर कदम यांच्या 'फँड्री'मध्ये प्रमुख भूमिका आहेत.