आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्याच दिवशी प्रियांकाच्या वडिलांनी घेतला होता जगाचा निरोप, पाहा वडिलांसोबतची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल प्रियांका चोप्रा आज यशोशिखरावर आहे. मात्र आजचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस आहे. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी प्रियांकाचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांनी या जगाचा निरोप घेतला. 10 जून 2013 रोजी अशोक चोप्रा यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. डॉ. अशोक चोप्रा 1997 मध्ये भारतीय सेनेतून लेफ्टनंट कर्नल पदावरुन रिटायर्ड झाले होते.
प्रियांका बालपणापासूनच आपल्या वडिलांची लाडकी होती. त्यामुळे वडिलांचे असे निघून जाणे तिच्यासाठी मोठा धक्का होता. आपल्या या यशामागे वडिलांचे योगदान असल्याचे प्रियांका वेळोवेळी आपल्या मुलाखतींमधून सांगत असते. प्रियांकाच्या प्रत्येक आनंदात तिचे वडील नेहमी तिच्यासोबत असायचे. मग ते मिस वर्ल्डचा खिताब मिळवणे असो किंवा फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावी करणे असो, प्रत्येक ठिकाणी प्रियांका आपल्या वडिलांसोबत दिसायची.
प्रियांकाचे वडिल आज तिच्यासोबत नाहीयेत, मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून ते नेहमीच तिच्यासोबत राहणार आहेत. प्रियांकाने आपल्या वडिलांसोबत घालवलेले खास क्षण छायाचित्रांमध्ये कैद करुन ठेवले आहेत. अनेक छायाचित्रांमध्ये प्रियांका आणि तिच्या वडिलांसह तिची आई मधू आणि भाऊ सिद्धार्थसुद्धा दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रियांकाने आपल्या वडिलांसोबत घालवलेले खास क्षण...