आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणाला आवड न्युयॉर्कची तर कुणाला गोव्याची, जाणून घ्या कुठे सुटी घालवणे पसंत करतात हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पहिल्या छायाचित्रात न्यूयॉर्कमध्ये फिरताना अभिषेक-ऐश्वर्या, दुस-या
छायाचित्रात गोव्यात सुटी एन्जॉय करताना बिग बी)
सिनेमांच्या शूटिंगसाठी बॉलिवूड स्टार्सना नेहमीच अनेक देशांची भ्रमंती करावी लागते. परंतु या स्टार्सना एन्जॉय करण्यासाठी काही खास ठिकाणे पसंतीस पडतात. ही ठिकाणे फक्त त्यांना सिनेमाच्या शूटिंगसाठीच नव्हे तर वैयक्तिक एन्जॉयमेंटसाठीसुद्धा आवडतात.
येत्या 27 सप्टेंबर रोजी वर्ल्ड टुरिज्म डे आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील काही निवडक सेलिब्रिटींच्या आवडत्या ठिकाणांविषयी सांगत आहोत...
अमिताभ बच्चन-
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला गोव्याच्या बीचवर किंवा लंडनमध्ये फिरायला आवडते. त्यांना इथेच सुटी एन्जॉय करणे पसंत आहे. गेल्या वर्षी त्यांनी त्यांची मुलगी आणि नातं यांच्यासोबत बराच वेळ येथे घालवला होता. लंडनमधील सेंट जेम्स कोर्टचे प्रेसिडेंशिअल सुइट हे त्यांचे निवांत वेळ घालवण्याचे ठिकाण आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे आवडते ठिकाण न्युयॉर्क आहे. त्यांना लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असल्यास दोघेही या शहराची निवड करतात. बच्चन कुटुंबीयांची रुची काही दिवसांपासून दुबईमध्येसु्ध्दा दिसून येत आहे. ते अनेकदा तिथे सुट्यांचा आनंद घेताना दिसले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आणखी काही सेलिब्रिटींच्या आवडत्या लोकेशन्सविषयी...