आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदाला वाटतेय भीती, 'मुलीच्या बॉलिवूड एन्ट्रीनंतर लोक म्हणतील वयस्कर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Titleगोविंदाने सैफला पाहायला लावला वाट - Divya Marathi
Titleगोविंदाने सैफला पाहायला लावला वाट
(फाइल फोटो- मुलगी नर्मदासोबत गोविंदा)
बॉलिवूडचा हिरो नं 1 अर्थातच गोविंदा 14 नंबरला लकी मानतो. तो 14 वर्षांचा असताना त्याच्या आईने त्याला सांगितले होते, की सर्व कुटुंबीयांची जबाबदारी तुझ्यावर आहे. गोविंदानेसुध्दा आपल्या आईचा शब्द पाळला. आता 2014मध्ये त्याचे 'किल दिल' आणि 'हॅपी एंडिंग' हे दोन सिनेमे रिलीज होत आहे. तसेच, त्याची मुलगी नर्मदानेसुध्दा बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी शूटिंगला सुरुवात केली आहे. मुलगी बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याने गोविंदा खूश आहे.
मात्र त्याला भिती आहे, की मुलीच्या एंट्रीने इंडस्ट्रीमध्ये त्याला वयस्कर म्हणून नये.
अलीकडेच, एका पत्रकाराने गोविंदाला विचारले, की तो सध्याच्या कोणत्या अभिनेत्रीला आपली फेव्हरेट मानतो. त्याने याचे उत्तर खूपच विनोदी स्वरुपात दिले, 'तू तर मला माझी आवडती अभिनेत्री विचारतोय आणि दुरसीकडे माझ्या मुलीच्या एंट्रीविषयी विचारून मला वयस्कर ठरवतोय.'
त्यानंतर गोविंदाने अनिल कपूरला विनोदी अंदाजात म्हणाला, 'अनिल कपूर अद्याप इतका कसा तरुण दिसतो माहित नाही. त्याची मुलगीसुध्दा हिरोइन बनून हिट झाली आहे. मला भिती वाटतेय, की माझी मुलगी अभिनेत्री झाल्यावर लोक मला वयस्कर म्हणू नयेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा गोविंदाच्या आयुष्याशी निगडीत काही इनसाइड गॉसिप्स...