आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कान्समध्ये छत्तीसगड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारण एक डझन आंतरराष्ट्रीय चित्रपट समारंभांत कान्स महोत्सवाची आपली एक प्रतिष्ठा आहे. त्यात चित्रपट प्रदर्शनाला आदराने पाहिले जाते. या समारंभात चित्रपट प्रदर्शनाबरोबरच चित्रपटाची खरेदी-विक्री पण होते. मुंबई चित्रपट उद्योगातून काही लोक दरवर्षी कान्सला जातात आणि याचा खूप बोभाटा करतात. आपल्या प्रसिद्धीसाठी मनानेच स्तुती केली जाते, खरं तर आपल्या चित्रपटाकडे कान्स महोत्सवात दुर्लक्ष केले जाते. कोणताही समीक्षक भारतीय चित्रपटांना गांभीर्याने घेत नाही.

छत्तीसगडचा तुषार वाघेला आणि त्याची पेंटर पत्नी प्रियंका यांच्या फक्त तीन लाखांत बनलेल्या ‘विचार छाया’ चित्रपटाला कान्स महोत्सवाच्या आयोजन समितीने निवडले आणि तेथे त्याचे प्रदर्शनही झाले.

तुषार वाघेलाने सिनेमाशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेले नाही आणि तो एखाद्या ‘तीसमारखां’चा सहायकदेखील नाही. त्याला सिनेमाचा एकलव्यदेखील म्हटले जाऊ शकत नाही, कारण त्याने कोणत्याही गुरूच्या स्वयंनिर्मित मातीच्या पुतळ्यासमोर कॅमेरा लावून अभ्यास केलेला नाही. तुषारने चित्रपटाची कल्पना आपल्या पत्नीला सांगितली आणि तिने कथा लिहिली आणि तिच्या कविता पटकथेत आहेत. कथा एका लेखकाची आहे, तो स्वत: रचलेल्या पात्राला वास्तविक आयुष्यात एका पेंटरमध्ये शोधतो. हा पेंटर हाडामांसाचा वास्तविक माणूस आहे की त्याची कल्पना आहे? एका दृश्यात बोलली गेलेली गोष्ट दुसर्‍या दृश्यात आव्हान देते. हा एक पारंपरिक चित्रपट नाही. याचे संक्षिप्त वर्णन आशुतोष भारद्वाजने एका सिनेपत्रिकेत लिहिले आहे. चित्रपट न पाहता किंवा त्याच्याविषयी माहिती न मिळवता त्याने लिहिले आहे. कारण कान्सचे आमंत्रण तुषारने स्वीकारले नाही. तो आपल्या चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाला उपस्थित नव्हता, त्याचे बाळ छोटे असल्यामुळे तो पत्नी प्रियंकासोबत भारतातच होता.

आजच्या दिखाव्याच्या काळात एक व्यक्ती कान्ससारख्या समारंभात जात नाही, कारण त्याची प्राथमिकता त्याचे कुटुंब आहे. या काळात तर लोक कान्समध्ये जाण्यासाठी उतावीळ होतात. नेता किंवा कलाकरांची छायाचित्रे घेतानालोक जिराफासारखी मान आत टाकून घुसखोरी करतात. क्रिकेटचे महागडे तिकीट विकत घेतात, कारण सामन्याच्या वेळी उपस्थित कलाकाराकडे कॅमेरा वळला तर तेदेखील टीव्हीवर दिसतील. दिखावा आज एक सामाजिक रोग झाला आहे. बरेच लोक आपल्या व्यापार आणि कुटुंबाला वेळ न देता एखाद्या कलाकारांच्या अवतीभोवती उभे राहतात आणि त्यामुळे एकदा विचारपूस केल्यावर आपले जीवन सार्थक मानतात. राजकारणातदेखील नेत्यांचा जन्म असाच होतो, पण त्यांना कमीत कमी पालिकेच्या तिकिटांची इच्छा असते. पण या कलाकारांच्या चमच्यांच्या मनात कोणतीही इच्छा नसते. त्यांना फक्त कलाकारांच्या जवळ राहणे आवडते.

असो, तुषार आणि प्रियंकाचा चित्रपट एम.एफ. हुसैनच्या चित्रपटाची आठवण करून देतो. शांताराम यांच्या ‘नवरंग’ मध्ये एक कवी आपल्या प्रेरणाचा पाठलाग करतो, ती एकदा त्याला दिसून अदृश्य होते. तो आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष करतो; पण नंतर त्याला कळते की पत्नीच प्रेरणेचे रूप धारण करून त्याला दिसत होती. याच कथेचे एक आणखी रूप राज कपूर यांच्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ मध्ये पाहायला मिळाले.

एकदा एम.एफ. हुसेन यांनी एका वाचनाने प्रेरित होऊन एक पेंटिंग बनवली होती. काव्य आणि पेंटिंगमधील ही जुगलबंदी होती. सृजनशील व्यक्ती मुळातच प्रयोगशील असते. अमेरिकन फिल्म ‘इनसेप्शन’मध्ये एका व्यक्तीची कथा आहे, तो दुसर्‍यांच्या स्वप्नात प्रवेश करून त्याच्यावर शासन करतो. स्वप्नाला ज्या दिवशी विज्ञान त्याच्या जादूतून ओढून प्रयोगशाळेत आणेल आणि त्याच्यावर त्याची इंजीनियरिंग शक्य होईल, तो दिवस ऐतिहासिक होईल. अशा प्रकारे स्मृतिपटलावरदेखील काम सुरू आहे. काहीच दशकांत मनासारखे स्मृ़तिपटल रोपण सुरू होईल.

‘विचार छाया’ चित्रपटाच्या नावानेच कळते की सावलीचे स्वतंत्र अस्तित्व नाही. ती माणसाच्या पुढे चालते; पण माणूस थांबला तर तीदेखील थांबते. ज्या दिवशी थांबलेल्या माणसाची सावली चालायला लागेल, त्या वेळी त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला स्वीकारले जाईल. दुर्दैवाने भारताच्या पारंपरिक विचारात पत्नीलादेखील पतीची सावली मानून तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला नाकारले गेले आहे.

एका अमेरिकन चित्रपटात व्यक्ती मृत्यूला निवेदन करतो की, त्याला सात दिवसांचा आणखी वेळ मिळावा. त्या सात दिवसांत मृत्यू त्याच्यासोबत राहतो आणि त्याच्या उत्तम जीवनाने प्रभावित होऊन त्याला सोबत न घेताच निघून जातो. असो, कान्समध्ये आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी छत्तीसगडमधील डोंगरगड, खैरागड आणि अंबिकापूर पाहिले, ही गोष्टदेखील समाधानकारक आहे.