आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feature Story On Aamir Khan's Satymev Jayate Show

और द्वार से क्यों नहीं आया?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानच्या 'सत्यमेव जयते'च्या या भागात जातियवाद आणि अस्पृश्यतेचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला. हा कार्यक्रम पाहताना मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित सत्यजित रे यांच्या ओम पुरी अभिनीत 'सद्गती' टेलिफिल्मची आठवण झाली. यात एका ब्राम्हण कुटुंबाच्या घरी एक दलित व्यक्ती कठोर परिश्रम करत मरण पावतो. त्या व्यक्तीच्या मृत्युचे दु:ख त्या ब्राम्हण कुटुंबाला मुळीच नाही, पण एका दलिताच्या मृतदेहाला हात कसा लावावा, याची त्यांना चिंता असते. त्यांना त्यांच्या 'धर्मा' ची चिंता असते. खरं तर शतकापासून माणसाच्या मनात असलेल्या या गोष्टीमुळे माणूस कसा संवेदनहीन होतो या गोष्टीकडे सत्यजित रे यांनी कटाक्ष केला होता. त्या ब्राम्हण दाम्पत्याला आपल्या अन्यायाची जाणीव नसते. दलिताकडून काम करून घेण्यास ते आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात. गिरीश कर्नाडच्या 'संस्कारा' चित्रपटाची आठवण आमिर खाननेच करून दिली. त्यात दोन ब्राम्हण मित्रांची कथा आहे. एका मित्राचे दलित मुलीवर प्रेम जडते आणि तो दलित वस्तीत राहायला जातो. काही वर्षांनंतर त्या क्रांतिकारी ब्राम्हणाचा मृत्यू होतो. त्या ब्राम्हणाचे अंत्यसंस्कार ब्राम्हण पद्धतीने करावे की, दलित रीतीने करावे, असा प्रश्न गावासमोर पडतो. हा निर्णय गावातील काही ब्राम्हण आणि त्याच्या मित्रावर सोडण्यात येतो. त्याचा मित्र विचारात पडतो की, मृत व्यक्तीचा जन्म तर उच्च कुळात झालेला आहे; पण एका दलित महिलेच्या प्रेमात पडल्यामुळे त्याने आपला धर्म भ्रष्ट केला. याच विचारात तो नदीत आंघोळ करायला जातो. काही वेळाने त्याच दलित स्त्रीला तो नदीतून बाहेर येताना पाहतो आणि त्यालाही तिच्या मादक सौंदर्याची भुरळ पडते. तो तिच्या मादक सौंदर्यात वाहून जातो. आता त्याला आपल्या मित्राच्या भावना कळालेल्या असतात. त्यामुळे तो मित्राचे अंत्यसंस्कार ब्राम्हण पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतो. शरदचंद्र यांच्या 'अभागी का स्वर्ग'वर देखील टेलिफिल्म बनलेली आहे. अनेक भागात दलितांचे मृतशरीर नदीत तसेच सोडले जातात, कारण 'अग्नी' देव असल्यामुळे दलितांना अग्निदानाचा अधिकार नसतो. असो, आमिरच्या याच कार्यक्रमात मदुराईच्या एका महिलेने सांगितले की, नदीच्या खालच्या भागात त्यांना पाणी भरण्याचा अधिकार आहे; पण उच्च वर्गाच्या महिला त्या भागात काचांचे तुकडे टाकतात. निसर्गाने दिलेल्या पाण्याच्या वाटण्या केल्यामुळेच संपूर्ण मानव जाती आता शापित झाली आहे का? त्यामुळेच पृथ्वीचा जलस्तर कमी होत आहे, नद्या कोरड्या होत चालल्या आहेत आणि ढग रुसले आहेत का? स्वातंत्र्याच्या आंदोलनाबरोबरच महात्मा गांधीजींनी वाईट चालीरीतींसाठीही संघर्ष केला. त्यांच्या 'हरिजन' मध्ये प्रकाशित एका सत्य घटनेवर आधारित भारती साराभाई यांनी त्याकाळी एक पद्य नाटक लिहिले होते. त्यात एक उच्चवर्णीय विधवा अपंग झाल्यामुळे तीर्थयात्रेवर जात नाही. तीर्थयात्रेसाठी ठेवलेल्या पैशाने ती गावात दलितांसाठी एक विहिर खोदून घेते. ती म्हणते, 'मैं शायद काशी नहीं देख पाउंगी, ईश्वर मेरे इस कायारूपी जर्जरित पात्र को नहीं भेजेगा सांसारिक तीर्थ स्थानोंपर, परंतु मुक्त हंस से मेरी आत्मा, ला सकेगी इस धरती पर वापस, एक नन्हे कुएं में, मां गंगा के पवित्र जल के साथ, खोई हुई मेरी सार्मथ्य'. ज्या मुद्यांसाठी महात्मा गांधीजींनी संघर्ष केला त्याच मुद्यांना आमिर खानने आपल्या सर्व भागांमध्ये मांडले. शतकापासून या सर्व समस्यांसाठी संघर्ष केला जात आहे; पण धर्माच्या नावावर सामान्यांच्या मनात ज्या गोष्टी रुजल्या आहेत तिथे परिवर्तनाच्या सगळ्या लाटा निर्थक ठरतात. पालथ्या घागरीवर लाखो लिटर पाणी टाकल्यावरही ती रिकामीच राहते. नवी दिल्लीत एक महिला आपल्या पतीच्या विनाकारण मारझोडीमुळे त्याचे घर सोडून आली आहे; पण तिला पश्चाताप होतो आणि तिच्या पतीचे मित्रदेखील तिला परत येण्यासाठी विणवत होते; पण आमिर खानच्या कार्यक्रमानंतर तिचा पश्चाताप नाहीसा झाला आणि पतीच्या मित्रांनीही पुन्हा तिला परतायला सांगितले नाही. अशा प्रकारचे सूक्ष्म परिवर्तन लोकप्रियतेच्या कोणत्याच मीटरवर दिसत नाहीत. राजस्थानमधील समस्तीपुराच्या रामपाल यांनी धोका पत्कारून आपल्या मुलाची घोड्यावर बसवून वरात काढण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधिकारी मानवेंद्र सिंहनेदेखील त्यांची मदत केली. त्या भागात उच्च जातीच्या लोकांचा याला विरोध होता. जे.पी. दत्तांच्या 'गुलामी' चित्रपटातील एका दृश्यात एका पोलिसाच्या मुलाला घोड्यावर बसताच गोळी मारण्यात येते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दिल्ली विद्यापीठाच्या डॉ. कौशल पवार यांनी आपला संघर्ष सांगितला. त्या दलित आहेत आणि आयुष्यभर त्यांनी त्रास सहन केला. निळ्या रंगाचा युनिफार्म घालण्यासाठी दलित मुलांना भाग पाडले जायचे, त्यांना पिण्यासाठी पाणी दिले जात नव्हते. आजदेखील हॉस्टेलमध्ये दलित विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या नावावर मारहाण केली जाते. कार्यक्रमात वाराणसीचे बटुकप्रसाद शास्त्री छाती ठोकपणे म्हणतात की, ते भारतीय संविधानाला मानत नाहीत आणि त्यांच्यासाठी वेदच सत्य आहेत. कार्यक्रमात स्टेलिन के. पद्मा यांचे वृत्तचित्र 'इंडिया अनटच्ड'मधील काही दृश्य दाखवण्यात आले. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचे म्हणणे होते की, माणसाचा रक्तगट सारखाच असतो; पण जातीच्या नावावर अन्यायाचा हा खेळ संपत नाही. ती जात नाही म्हणून तिला जात म्हणत असावे. ही वाईट प्रथा सगळ्याच धर्मात आहे. कबीर म्हणतात, 'तू बामन बामनी जाया, और द्वार से क्यों नहीं आया.'
सत्यमेव जयते
'सत्यमेव जयते'चे दुसरे पर्व लवकरच
सत्यमेव जयते : २७ वर्षांपर्यंत जावेद अख्तर होते पक्के दारुडे
सत्यमेव जयतेचा परिणाम : आमिर खानची सरकारबरोबर २०० कोटींची डील ?