आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feature Story On Bollywood Actor Nasiruddin Shah

नसिरुद्दीन शाह यांचा संघर्ष

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतर तरुणांप्रमाणे मलाही आपल्या तारुण्यात प्रतिष्ठा आणि पैसा मिळवण्याची इच्छा होती, असे नसिरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी हळूहळू स्वत:चा शोध घेतला. चित्रपट जगतात आल्यानंतरसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मुळे वास्तविकतेत इतकी रुजली होती की त्यांच्यावर ग्लॅमरचा प्रभाव पडला नाही. सुरुवातीला ते कला चित्रपट करत गेले कारण त्यांना व्यावसायिक चित्रपटाचा प्रस्ताव आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कला चित्रपटांचा 'ठपका' लागला आणि काही पत्रकारांनी त्यांना समांतर चित्रपटातील अमिताभ बच्चनदेखील म्हटले. अशा प्रकारच्या स्तुतीला ते आपला आदर समजत नाहीत.

अमिताभ बच्चनप्रमाणेच ते देखील केलेल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्याचे ते मान्य करतात. शिवाय अमिताभ बच्चनने आपल्यासारखे समांतर चित्रपट कधी केले नाही, असेही ते स्पष्ट करतात. अमिताभच्या नावानेच बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पडत होता. दोघेही श्रेष्ठ कलाकार आहेत हे स्पष्टच आहे. अनेक चित्रपटात त्यांनी मनाविरुद्ध भूमिका केल्या या गोष्टीसाठी अमिताभचे कौतुक केले पाहिजे. त्या भूमिका आणि चित्रपटाविषयी आपली वैयक्तिक घृणा लपवण्यात ते यशस्वी झाले, पण हे नसिरुद्दीन शाह यांना जमले नाही. खरं तर वाईट स्थितीत काम करूनही त्या संबंधी आपले मत लपवणे सोपे काम नाही. इतर क्षेत्रातील अनेक प्रतिभावंत लोक आपल्या घृणेला लपवू शकले नाही आणि ते खराब परिस्थितीलाही थांबवू शकले नाही. ज्यांच्या विरोधात लढाई जिंकता येत नाही त्या पक्षात सामील होणेच बरे अशी भूमिका काहीनी घेतली. वाईट गोष्टींचा विरोध न केल्याने किंवा त्याच्या आहारी गेल्याने तो वाढत जातो.

नसिरुद्दीन शाह यांचे मित्र ओम पुरी यांनी वेगळी वाट निवडत या दुधात साखरेप्रमाणे मिसळले. खरं तर हे काम ओमसाठी सोपे नव्हते, पण अभिनयाचा ठसा उमटवण्याबद्दल ते शपथबद्ध होते. अशा प्रकारच्या वाईट गोष्टीत मिसळणे आणि जन्मत: वाईट असण्यात फरक आहे. धृतराष्ट्रपेक्षा गांधारीचे अंधत्व जास्त कठीण होते. गांधारीने नदी, डोंगर, फुल, इंद्रधनुष्य सर्व काही पाहिलेले होते.निसर्गाचे सौंदर्य पाहिल्यानंतर ते न पाहण्याचा निर्णय अवघड होता.

असो, कलाकार नेहमी स्वत:च्या प्रतिमेत गुंग होणारे नार्सिसिष्ट असतात, असे नसिरुद्दीन शाहचे म्हणणे आहे. ग्रीकमधील पुराणकथेत नार्सिसस नावाच्या तरुणाची कथा आहे तो अतिशय सुंदर होता आणि स्वत:ला सरोवरात न्याहाळताना त्यात बुडून मरण पावला. नसीरकडे स्वत:मध्ये मग्न होण्याचा मूर्खपणा नाही. सर्वच कलाकार नार्सिसिष्ट नसतात. काही कलाकार देखणे नसूनही यशस्वी कलाकार झालेले आहेत. प्रत्येक माणूस सोयीस्कर गोष्टीवरच विश्वास ठेवतो. कालांतरात सुविधादेखील सिद्धांताप्रमाणे स्थापित केल्या जातात.

नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या करिअरला जीवन मानले नाही, पण उपजीविकेसाठी चित्रपट केले. रंगमंचापासून त्यांना खरे सुख मिळाले. कथा ऐकताना पडद्यावर ती कथा कशा प्रकारे सादर होईल याची कल्पना करणे कठीण आहे. शेवटी प्रत्येक कलाकार भूमिका निवडण्यात चूक करतोच. दक्षिणेच्या आत्मकेंद्रित कलाकारांच्या रूपात नसीरला 'द डर्टी पिक्चर'साठी घेणे हे मिलन लुथरियाचे धाडस म्हणावे लागेल आणि नसीरने आपल्या अभिनयातून भरपूर तिरस्कार मिळवला. या चित्रपटापेक्षा 'ए वेन्सडे' चित्रपटातील नसीरची भूमिका खूप वेगळी होती. अनेक अपारंपरिक चेहर्‍याचे तरुण नसिरुद्दीन शाहकडून प्रेरणा घेऊन अभिनयात आले. जयपूरचा इरफान खान कमालीचा अभिनेता आहे. 'पान सिंह तोमर' अमेरिकेत बनला असता तर इरफान ऑस्करसाठी नामांकित झाला असता. अशा प्रकारे केके मेनन समोर आले. चॉकलेटी चेहरा अभिनयासाठी आवश्यक असतो अशी भ्रामक समजूत ओम आणि नसीर यांनी खोडून काढली. संवेदना अनुभवण्याची ताकद आणि पात्राची मानसिकता समजण्याची क्षमता या दोन गोष्टी अभिनयासाठी आवश्यक असतात. आजच्या काळात संवेदनाची कमतरता दैनंदिन जीवनातसुद्धा आपण पाहू शकतो. सामान्य माणूस हे नुकसान अनुभवू शकतो. अभिनेता संवेदनेला अनुभवतातच नव्हे, तर आपल्या विचाराच्या मिक्सरमध्ये त्याला घोटून चित्रीकरणाच्या वेळी व्यक्त करण्यासाठी तयार राहतो. संवेदनेत चढउतार सुद्धा त्याच्या कामाचाच भाग आहे.

श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड, सई परांजपे सारखे चित्रपट निर्माते, नसीर यांना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच भेटले. यांच्यासोबत काम केल्याने त्यांची कला आणखीनच उजळत गेली. असो, चित्रपट जगतात नसीर स्वत: एका शाळेप्रमाणे झाले आहेत.

एक्स्ट्रा शॉट
नसिरुद्दीन शाह यांना भारत सरकारद्वारा 1987मध्ये 'पदमश्री' आणि 2003 मध्ये 'पद्मभूषण' देऊन गौरविण्यात आले आहे.


'सत्यमेव जयेत' : हवेत विष पसरत आहे ?