आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट निर्माते आणि तारका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेक्सपिअरच्या रोमिओ जुलियटवर आधारित 'रामलीला' मध्ये संजय लीला भन्साळी यांनी करीना कपूरच्या जागी प्रियंका चोप्राला घेतले आहे. ताज्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये होणारे लग्नही करीनाला थांबवण्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत करीनाचे लग्न होईल आणि कदाचित ती आईसुद्धा होईल असा विचार संजयच्या मनात आला असावा. अशी भीती प्रत्येक चित्रपट निर्मात्याला असते. 'मदर इंडिया' चे चित्रीकरण संपताच नर्गिस-सुनील दत्त यांनी लग्न केले होते, पण महबूब खानच्या सांगण्यावरून ही गोष्ट गुपित ठेवण्यात आली. कारण चित्रपटात त्यांची भूमिका आई आणि मुलाची होती. वास्तविक आयुष्यातल्या लग्नामुळे चित्रपट व्यवसायावर प्रभाव पडला असता. अशा प्रकारची भीती होणे स्वाभाविक आहे.
राजकपूर यांचा 'बॉबी' शेवटच्या टप्प्यात असताना नायिका डिंपल कपाडियाने राजेश खन्नासोबत लग्न केले होते, पण 'बॉबी'ने यशाचा नवा उच्चांक स्थापित केला. या घटनानंतर राजेश खन्नाचे चित्रपट अयशस्वी होत गेले ही वेगळी गोष्ट आहे. 'बॉबी' आणि अमिताभचा 'जंजीर' काही महिन्याच्या अंतराने प्रदर्शित झाले होते. अमिताभ बच्चनचा उदय आणि राजेश खन्नाच्या प्रसिद्धीचा शेवट एकत्रच झाला. काही वर्षापूर्वी संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि करीना कपूरसोबत 'बाजीराव मस्तानी' बनवण्याची घोषणा केली होती, पण काही कारणामुळे हा चित्रपट आतापर्यंत बनला नाही. ज्या प्रकारे भन्साळी यांनी माधुरी दीक्षितसोबत काम केले होते, त्याच पद्धतीने करीनासोबत काम करण्याची त्यांची इच्छा असावी. संजयच्या 'खामोशी' चित्रपटाला माधुरीने नाकारले होते, काही वर्षांनतर त्यांनी 'देवदास'मध्ये चंद्रमुखीसाठी माधुरीला घेतले. कदाचित अशाच प्रकारे ते एक दिवस करीनासोबतही काम करतील.
खरं तर संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्या रायला 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास'मध्ये परिणामकारक पद्धतीने सादर केले. चित्रपट कलेत तरबेज असलेल्या चित्रपट निर्मात्यांची ही जुनी परंपरा आहे. राज कपूर, गुरुदत्त, विजय आनंद आणि राज खोसला या कामात निपुण होते. हा एक योगायोग असू शकतो, पण राजकपूर यांना त्यांच्या दोन नायिकांसोबत प्रेम झाले होते, तर गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांनाही प्रेम झाले होते. या विषयावर एकदा राज कपूर यांनी म्हटले होते की, चित्रपटाच्या गरजेनुसार चित्रपट निर्माता नायिकेला अतिशय मादक रूपात सादर करतो आणि नायिका आपल्या या रूपाला पाहून मंत्रमुग्ध होते आणि चित्रपट निर्मात्यावर प्रेम करायला लागते.
खर्‍या आयुष्यातदेखील प्रियकराच्या मनोहारी गोष्टीत रमून प्रेयसी आपले रूप पाहून मंत्रमुग्ध होते, पण लग्नानंतर पुन्हा या गोष्टी होत नसल्याने प्रेमाचा भ्रम तुटतो का? प्रेम कधी-कधी आणि कुठे-कुठेच होत असते, पण त्याचा भ्रम नेहमी होत राहतो. 'आय लव यू' कधी तोंडातून निघतो तर कधी पोटातून निघतो आणि कधी हृदयातून म्हटला जातो. मुलगी सुंदर आणि श्रीमंत असल्यावर हा शब्द डोक्यातूनही निघतो. जेव्हा या शब्दात काहीच स्वार्थ नसतो तेव्हा यात खरेपणा असतो. समोर एखादी प्रतिमा नसताना आणि मनात काही स्वार्थ नसताना झालेल्या प्रेमाला दिव्य म्हटले जाते. सूफी, संत आणि शायर असेच बनले आहेत.
गुरुदत्त यांनी वहिदा रहेमान यांना हैदराबादच्या एका नृत्य कार्यक्रमात पाहिले. स्क्रीन टेस्टनंतर त्यांनी वहिदाला आपल्या 'सी.आई.डी' चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. नंतर आपल्या सर्वात महत्त्वाकांक्षी 'प्यासा' चित्रपटात त्यांनी वहिदाला घेतले. काही दिवसाच्या चित्रीकरणानंतर त्यांच्या सहकार्‍यांना नायिका पसंत पडली नाही. तेव्हा त्यांनी काही दिवस कोलकातामध्ये राहून संपादन केले आणि ती संपादित रील पाहून सर्वच चकित झाले. अशा प्रकारच्या उत्पत्तीलादेखील प्रेम म्हटले जाते. खरं तर ही एका प्रकारची जिद्द असते. एक चित्रपट निर्माता नायिकेला सादर करण्याची नवनवीन पद्धती शोधत असतो. जणू ती त्याच्या मनात आणि विचारात बसलेली असते. या जिद्दीमुळेच सुंदर परिणाम समोर येतात.
संजय लीला भन्साळीदेखील आपल्या चित्रपटाला तल्लीन होऊन बनवतात. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातल्या ऐश्वर्या रॉयचे पहिले दृश्य आठवा. ती एका खेळाच्या मैदानावर पळत येते आणि मुलांच्या खेळात सहभागी होते. त्यात नायिकेची जगण्याची ऊर्जा आणि खोडकरपणा स्पष्ट दिसून यतो. संजयचे चित्रपट ऑपेरानुमा असतात आणि गाण्याच्या चित्रीकरणाची त्याची वेगळीच पद्धत आहे.
इतक्या एकाग्रतेने आणि अंतर्भूत होऊन चित्रपट बनवत असतानाही त्याला एखाद्या नायिकेसोबत प्रेम झाल्याचे कधी ऐकिवात आले नाही. त्याला फक्त आपल्या कामाशी प्रेम आहे. 'सावरिया' मध्ये त्याने सोनम कपूरला असे सादर केले की लोकांना गुरुदत्तच्या चित्रपटातली वहिदा रहेमानची आठवण झाली. आता ते पुन्हा प्रेमकथाच्या चित्रपटाकडे वळले आहे. प्रियंका सुंदर आणि प्रतिभावंत आहे आणि भन्साळी तिला नक्कीच मनमोहक रूपात सादर करतील.
करीना कपूर होणार पंतप्रधान !
लग्नात करीना परिधान करणार सासूबाई शर्मिलाचा शरारा
PHOTOS : करीना कपूरचा नवा झीरो साईज अंदाज