आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feature Story On Rohit Shetty's Bol Bachchan Film

सामाजिक बांधिलकीचा विनोदी चित्रपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू आणि मुसलमान या दोन समाजाच्या लोकांच्या लग्नाची कथा रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या 'बोल बच्चन'मध्ये दाखवण्यात आली आहे. या विषयावर बनलेले गंभीर चित्रपट आजचा असहिष्णू समाज पाहत नाही आणि दोन समाजात उपस्थित असलेल्या गुंडांना विरोध करण्याची संधी मिळते. पण रोहित शेट्टीने या विषयावर एक विनोदी चित्रपट बनवला आहे. चित्रपटाला इतके विनोदी बनवण्यात आलेय की कोणताही समाज यावर आक्षेप घेणार नाही. दोन्ही समाजाच्या लोकांमध्ये काहीच अंतर नसते, ही गोष्ट माहीत असूनही आपण कानाडोळा करत असतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. दोघांच्याही रक्ताचा रंग लाल आहे. पात्राचे चरित्रचित्रण अशा पद्धतीने करण्यात आलेय की तो कोणत्या धर्माचा आहे हे ओळखणे कठीण होते. खरंतर भारतीय चित्रपटाच्या पात्राला त्याचा धर्म दाखवून सादर करता येत नाही. काही वर्षांपूर्वी तर पात्राचे आडनावदेखील दाखवले जात नव्हते.
चित्रपटात अनेक जुन्या यशस्वी चित्रपटाचे संदर्भ आणि संवाद घेण्यात आले आहेत. या चित्रपटाला त्या यशस्वी चित्रपटांची आदरांजली म्हणावे लागेल. एवढेच नव्हे तर क्लायमॅक्समध्येदेखील 'कर्ज' चित्रपटाच्या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटात विनोद ठासून भरलेला आहे. विनोद आणि अश्रूंचा कोणताच धर्म नसतो. हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गोलमाल' वर आधारित आहे पण संवाद अनेक यशस्वी चित्रपटातून घेतले आहेत. बाबू मोशाय यांच्या 'गोलमाल'मध्ये दोन समाजाचे प्रकरण नव्हते पण रोहित शेट्टीने हे धाडस केले आहे.
अतिशय गंभीर समस्यांवर चर्चा करतेवेळी त्यात विनोद मिसळला तर त्यातून तो राग नाहीसा होतो. असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. दैनंदिन आयुष्यातही रस्त्यावर चालताना दोन लोकांची टक्कर होते, वाद निर्माण होतो आणि ती गोष्ट हाणामारीपर्यंत जाऊ शकते. जर प्रकरणात विनोद असला तर दोन्ही लोक हसत घरी जाऊ शकतात. ज्या प्रमाणे डोंगरामध्ये एक सूक्ष्म रेघ असते आणि ती छोट्या हातोड्यानेही तुटते. त्याचप्रमाणे गंभीर गोष्टीतही विनोद असतोच. पहिलवानाच्या शरीरालदेखील गुदगुल्या केल्या तर तो खदखदून हसतो. कदाचित त्यामुळेच डोंगरातून नद्या निघतात. डोंगर गंभीर आहेत आणि नद्या त्यांचा विनोद आहे. विनोदाचे अनेक प्रकार आहेत अनेकदा ते निबरुद्ध वाटतात. टीव्हीवरील सुरू असणारी 'कॉमेडी सर्कस' भद्द आणि अश्लील असतात. आपल्या चित्रपटातदेखील विनोदाच्या नावावर अश्लीलता असते. खरंतर दादा कोंडके यांच्या विनोदाची पद्धत त्यांच्या जन्मापूर्वीच ग्रामीण भारतात होती. विनोदातच निर्मळ आनंद असतो असे ऋषिकेश मुखर्जी म्हणत होते. व्यंगदेखील विनोदी असतात. रोहित शेट्टीने या चित्रपटात निर्मळ आनंद रचला आहे. मागील अनेक चित्रपटाचे संवाद यात टाकण्यात आले आहेत आणि त्यासाठी त्यांनी तसे दृश्य निर्माण केले आहेत. कथेचा आधार हिंदू-मुस्लिम प्रेमविवाह आहे हे माध्यमांना कळले नाही, ही मजेदार गोष्ट आहे. व्यावसायिक टीकाकारांना विनोदी चित्रपटावर आक्षेप असतो कारण ते दांभिक बौद्धिकतेने ग्रस्त असतात. खरंतर सरकाराप्रमाणेच 'विद्वान टीकाकारांना' सामान्य माणसाच्या खुश होण्यावरच आक्षेप असतो. आपल्याला हसताना पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. देव आनंद यांच्या चित्रपटात एक गाणे होते, 'अरे ओ आसमां वाले, बता इसमें बुरा क्या है, खुशी के चार झोंके गर इधर से भी गुजर जाएं'
चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक मुस्लिम पात्र अनेक वर्षापासून बंद असलेल्या वादग्रस्त मंदिराचे कुलूप तोडतो, कारण मंदिराच्या भिंतीवरून चालताना एक मुलगा तलावात पडतो. पण मुलाला वाचवण्यासाठी कुलूप तोडण्याचा मार्गच त्याच्याकडे असतो. पण लोकांच्या भीतीमुळे तो आपले नाव अभिषेक बच्चन असे सांगतो. एकदा खोटे बोलण्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अनेकदा खोटे बोलावे लागते. यावर नायक म्हणतो की, मी माझे काम मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केले तर देव आणि अल्लाह मला क्षमा करेन. आज जर एखाद्या धार्मिक जागेविषयी गंभीर चित्रपट बनवला तर प्रलय येईल. पण रोहित शेट्टीने आपल्या प्रतिभेने गंभीर विषयावर विनोदी चित्रपट बनवला त्यामुळे प्रेक्षकांना मुद्दा काय आहे तो कळलाच नाही. एक पात्र म्हणते, जेव्हा एक श्रीमंत माणूस निर्माता होतो तेव्हा तो निर्मितीच्या कामात अडथळा आणतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी चित्रपटात आहेत. अजय देवगणने नेहमीप्रमाणेच कमाल केली आहे. नायिकेसोबत एका गंभीर दृश्यात तर त्याने जादू केली आहे. इतक्या विविध भूमिका कोणताही स्टार करत नाही.अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच प्रभावित केले आहे.

एक्स्ट्रा शॉट
'बोलबच्च्न'मध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी आधी बिपाशा बासू आणि जेनेलिया डिसुझाला निवडण्यात आले होते; पण नंतर या भूमिका असिन आणि प्राची देसाई यांनी साकारल्या.
'बोल बच्चन'ने दाखवला दम, आठवड्याभरात केली १०१.७६ कोटींची कमाई
'बोल बच्चन'ची ३ दिवसांत ७२.८ कोटींची कमाई, आता तयारी सिक्वेलची...
फसवी 'बोल बच्चन'गिरी
EVENT PICS: 'बोल बच्चन'च्या प्रीमिअरला बच्चनचा बोलबाला