आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feneliya ritesh to postpone honeymoon for tere naal love ho gaya

जेनेलिया- रितेशचा हनीमून 'तेरे नाल..'मुळे लांबणीवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या बॉलिवूडकरांना वेध लागलेत अभिनेत्री जेनेलिया डिसुजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्‍या 3 फेब्रुवारीला होणा-या लग्‍नाचे. पण, या दोघांच्‍या केमिस्‍ट्रीचा 'तेरे नाल लव्‍ह हो गया' हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्‍या प्रमोशनसाठी या दोघांनी त्‍यांचा हनीमून लांबणीवर टाकला आहे.
कलाक्षेत्रात 'शो मस्‍ट गो ऑन' असे नेहमीच म्‍हटले जाते. चित्रपटाचे महत्‍त्‍व ओळखून खासगी गोष्‍टी बाजूला ठेवण्‍याचे धारिष्‍ट्य कलाकारांकडे असते. याबाबत रितेशला विचारले असता तो म्‍हणाला की, 'आम्‍ही आमचा हनीमून थोडासा लांबवला आहे. 'तुझे मेरी कसम'नंतर तब्‍बल नऊ वर्षांनी आम्‍ही 'तेरे नाल..'मध्‍ये एकत्र काम केले आहे. त्‍यामुळे प्रेक्षकांसोबत आम्‍हालाही या चित्रपटाबाबत उत्‍सुकता आहे. शिवाय निर्मात्‍यांनी चित्रपटाच्‍या प्रमोशनचे वेळापत्रक आधीच तयार करून ठेवले असल्‍याने आम्‍हाला प्रमोशनलाच अधिक प्राधान्‍य द्यावे लागेल.'
रितेश आणि जेनेलियासाठी फेब्रुवारी महिना खासगी आणि सार्वजनिक आयुष्‍यात आनंद मिळवून देणारा ठरेल, यात शंकाच नाही.