आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FHM India's 100 Sexiest Women In The World 2014: Deepika Dethrones Katrina!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिकाच्या शिरपेचात मानाचा तुरा, ठरली सर्वात सेक्सी वुमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दीपिका पदुकोण)

मुंबई -ब्रिटेनमधील FHM या पुरुष लाइफस्टाइल मॅगझिनने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची निवड 2014 मधील सर्वात सेक्सी वुमन म्हणून केली आहे. हा मान गेल्या तीन वर्षांपासून कतरिना कैफला मिळत होता. मात्र यावर्षी दीपिकाने कतरिनाला मात देत हा खिताब आपल्या नावी केला.
यावर्षी या चुरशीत कतरिना कैफला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. दीपिकानंतर प्रियांका चोप्राची सर्वात आकर्षक महिला म्हणून निवड झाली. रंजक गोष्ट म्हणजे 2011मध्ये दीपिका या रेसमध्ये सामील झाली होती. मात्र त्यावेळी ती दुस-या स्थानावर होती. 2012 आणि 2013मध्ये दीपिका या शर्यतीत तिस-या स्थानावर राहिली होती. मात्र यावर्षी सर्व आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत दीपिकाने हा खिताब आपल्या नावी केला.
खिताब मिळाल्यानंतर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, ''ही खूप चांगली सुरुवात आहे. जेव्हा लोक तुम्हाला सेक्सी म्हणतात, तेव्हा यापेक्षा दुसरी चांगली कॉम्प्लिमेंट असूच शकत नाही. माझ्यासाठी सेक्सी या शब्दाचा अर्थ व्यक्तिची पर्सनॅलिटी, तिचा सेन्स ऑफ ह्युमर, आत्मविश्वास आणि इमोशनल, सेंसिटिव्ह असा होतो.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेक्सी दीपिका पदुकोणची खास छायाचित्रे... ही सर्व छायाचित्रे इंटरनेटवरील विविध माध्यमांमधून साभार घेण्यात आली आहेत...