आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fight Between Director And Producer Of Mickey Virus

\'मिकी वायरस\'च्या निर्माता-दिग्दर्शकात वाद, 8 लाखांसाठी जाणार कोर्टात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खानच्या 'बिग बॉस'च्या मंचावर 'मिकी वायरस' हा सिनेमा प्रमोट करताना अभिनेत्री एली अवरामने 'मालवीय नगर के जेम्स बाँड' हा डायलाँग अनेकदा म्हटला होता. मात्र या सर्व प्रमोशनचा फायदा सिनेमाला होऊ शकला नाही. बरेच प्रमोशन करुन देखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. आता या सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शक यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
'मिकी वायरस'द्वारे दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे सौरभ वर्मा आणि निर्मिती कंपनी डार मोशन पिक्चर्स यांच्यात 'मिकी वायरस'सह तीन सिनेमे बनवण्याचा करार झाला होता. तीन सिनेमानंतरच हा करार संपणार होता. मध्येच हा करार मोडल्यास सौरभ यांना निर्मिती कंपनीकडून एनओसी घेणे बंधनकारक राहिल, अशी अट घालण्यात आली होती.
'मिकी वायरस' या सिनेमाचा निर्मिती खर्च पाच कोटींहून सहा कोटींवर गेला. एवढे पैसे गुंतवणून देखील हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता पाच महिन्यांनी सौरभने निर्मिती कंपनीला नवीन सिनेमा सुरु करण्याविषयी आणि 'मिकी वायरस'चे उर्वरित आठ लाख रुपये मानधन मागितले, असता माशी शिंकली आहे.
डार मोशन पिक्चर्स या निर्मिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फ्लॉप सिनेमा पाठिशी असल्यामुळे कंपनी सध्या नवीन सिनेमाच्या निर्मितीच्या विचारात नाहीये. सौरभ वर्माला एनओसी लेटर देण्याविषयी विचारले असताना, कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की 'मिकी वायरस' हा सिनेमा डार मोशन पिक्चर्सला विकण्यापूर्वी सौरभ वर्माने हा सिनेमा निर्माता कपिल मट्टूला विकला होता आणि टोकन अमाउंटसुद्धा घेतली होती.
पुढे वाचा, डार मोशन पिक्चर्सने कोणता दावा केला आहे...