आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा, 'फुगली' आणि 'ख्वाब'चा फस्ट लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर सदानंद दिग्दर्शित 'फुगली' आणि जाएद अली खान दिग्दर्शित 'ख्वाब'चा फस्ट लूक रिलीज झाला आहे. या दोन्ही सिनेमांमधील सदानंद यांच्या 'फुगली' विषयी सुरूवातीला जाणून घेऊया.
'फुगली' एक थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा अक्षय कुमार आणि अश्विनी यार्डी मिळून निर्मित करत आहेत. देव, देवी, गौरव आणि आदित्य या चार दिल्लीच्या मित्रांनी कहाणी सिनेमात रेखाटण्यात आली आहे. या चारही मित्रांचे कॉलेज पूर्ण झाल्यानंतर करिअर घडवण्याचे स्वप्न असते. परंतु त्यांच्यासोबत असे काही घडते ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. या सिनेमात जिमी शेरगिल आणि बॉ़क्सर विजेंदर मुख्य भूमिका साकारत आहेत. सिनेमात जिमी एका पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. तिच्या पात्राचे नाव एसएचओ चौटाला आहे. हे चार मित्र कोणत्या संकटांचा सामना करतात आणि कसे त्यातून बाहेर पडतात ही संकल्पना सिनेमात चित्रीत करण्यात आली आहे.
'फुगली'मध्ये विजेंदर आणि जिमी शेरगिलव्यतिरिक्त मोहित मारवाह, कायरा आडवाणी आणि अर्फी लांबासुध्दा दिसणार आहेत. कबीर सदानंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही. सुरूवातीला हा सिनेमा 16 मे रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'ख्वाब' सिनेमाचा फस्ट लूक...