आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक अंदाजात मिष्टी-कार्तिकने केले 'कांची'चे प्रमोशन, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मिष्टी घोष आणि अभिनेता कार्तिक तिवारी आपल्या आगामी 'कांची' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. 12 एप्रिल रोजी हे स्टार्स दिग्दर्शक सुभाष घईंसोबत सिनेमाचे प्रमोशन करताना दिसले. यावेळी दोन्ही स्टार्सचा रोमँटिक अंदाज बघायला मिळाला. या दोघांनी फोटोग्राफर्सला रोमँटिक मूडमध्ये पोझ दिल्या. कार्तिक आणि मिष्टीसह यावेळी ऋषी कपूर, सोनू निगम, इस्माइल दरबार, सुखविंदर सिंहसह बरेच सेलेब्स प्रमोशनवेळी उपस्थित होते.
'कांची' या सिनेमात मिष्टीने सत्ताधा-यांच्या विरोधात आवाज उठवणा-या तरुणीची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा सुभाष घई यांनी दिग्दर्शित केला असून या सिनेमाचे निर्मातेसुद्धा तेच आहेत. सुभाष घई यांनी ‘कालीचरण’(1976), ‘विश्वात्मा’(1978), ‘कर्ज’(1980), ‘हीरो’(1983), ‘कर्मा’(1986), ‘राम लखन’(1989) आणि ‘खलनायक’(1993) यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. कांचीपूर्वी 2008 मध्ये त्यांचा 'युवराज' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
'कांची'मध्ये मिष्टी आणि कार्तिक यांच्यासह मिथून चक्रवर्ती, ऋषी कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाद्वारे मिष्टी घोष बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. इस्माइल दरबार आणि सलीम-सुलेमान या सिनेमाचे संगीतकार आहेत. येत्या 25 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'कांची'च्या प्रमोशनवेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...