आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राउडी राठोड : जूनीच दारू नव्या बाटलीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक मयंक शेखर लिखित... फिल्म रिव्ह्यू.
'मी मृ्त्यूला घाबरत नाही तर, मृत्यू मला घाबरतो.' अशी गर्जना पोलिस अधिकारी विक्रम राठोड करतो. जेव्हा तो २०-२० लोकांशी एकटा सामना करतो तेव्हा, त्याच्या वरील वाक्याची आपल्याला प्रचिती येते. अशातच जेव्हा राठोड जखमी होतो, आणि जमिनीवर पडतो तेव्हा आपल्याला वाटते आता सर्व संपले. मात्र, तेव्हाच आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते. पावसाचा पहिला थेंब राठोडच्या चेह-यावर पडतो आणि जोरदार पावसाला सुरुवात होते.
असा इंटरनॅशनल खिलाडी अक्षय कुमार 'राउडी राठोड'मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कॉमिक-अँक्शन चित्रपटांच्या श्रेणीतील हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटांच्या हिंदी रिमेकमध्ये आपल्याला लक्षात राहिलेले प्रमुख चित्रपट आहेत, आमिर खानचा 'गजनी' (२००८) आणि सलमान खानचा 'वांटेड' (२००९).
'वांटेड'च्या यशानंतर सलमानने अशाच प्रकारचे तीन हिट चित्रपट दिले आहेत. 'दबंग', 'रेडी' आणि 'बॉडीगार्ड'. 'दबंग' प्रमाणेच 'राउडी राठोड' आहे. या चित्रपटाची पार्श्वभूमी देखील उत्तर भारताची आहे. 'रेडी' मधील 'ढिंका चिका' सारखेच एक गाणे यात आहे, 'चिंताता चिता चिता.' यावर नायकाने यथेच्छ ठुमके लागावले आहेत. यावरून आपल्याला एक अंदाज येतो की, हिंदी चित्रपटनिर्माते कोणत्या चित्रपटांपासून प्रेरणा घेतात.
'वांटेड'चा दिग्दर्शक प्रभू देवा याने चाळीशी पार केलेल्या सलमानला या चित्रपटातून दक्षिण भारतीय चित्रपटांच्या नायकांच्या रांगेत नेऊन बसवले. तेव्हा पासून सलमान देखील हिंदीतील रजनीकांत आणि गरीबांचा मसिहा नायक या भूमिकेत दिसू लागला. 'राउडी राठोड'चा दिग्दर्शकही प्रभू देवाच आहे. अक्षय कुमार या चित्रपटात दुहेरी भूमिकेत आहे. त्यामुळेच चित्रपटाचे पोस्टर एका तिकीटात डबल धमाका लोकांना आकर्षीत करते.
मात्र सर्वात महत्त्वाचे काही असेल तर, ती आहे कथा.
देवगड (हे नाव शोलेमधील रामगडशी मिळते जूळते आहे.) नावाच्या एका उजाड वस्तीवर बापजी (सनी देओलच्या नरसिम्हा वरुन प्रेरणा घेऊन कदाचित हे नाव ठेवण्यात आले असावे) नामक एका व्यक्तीची सत्ता असते. महिलांवर बलात्कार करणे हा त्याचा आवडता छंद असतो. पोलिसांच्या बायकांनाही तो सोडत नाही. भरदिवसा तो महिलांना उचलून घेऊन जातो आणि पोलिस नुसते हातावर हात ठेऊन बघत राहातात. याच देवगडमध्ये राठोडचे आगमन होते. त्याच्या कार्यालयात गांधीजी एवजी भगतसिंगचा फोटो असतो. यावरुनच आंदाज लावता येतो की, हाच बापजीला पाणी पाजणार.
मात्र अचानक राठोड गायब होते, किंवा त्याला मारून टाकले जाते. त्याच्यासारखाच दिसणारा असतो, मुंबईचा शिवा. त्याच्यात आणि राठोडमध्ये तिळमात्र फरक नसतो. फरक असतो फक्त त्याच्या मिशीमध्ये. एक ठग असणा-या शिवाची सोनाक्षी सिन्हा गर्लफ्रेंड असते. शिवा ठग आहे मात्र, भोंदू नाही. तोही राठोड सारखाच शत्रूला धुळ चारायला सक्षम आहे. त्याचा एक डायलॉग आहे, 'जो मै बोलता हूं, वो मै करता हूं. जो मै नही बोलता, वो डेफिनेटली करता हू', तेव्हा आपल्याला वाटत राहाते की, याने अँक्शनसोबतच थोडी कॉमेडी केली असती तरी चालले असते. (अमिताभ बच्चन यांचा डॉन आठवतो ना...)
अक्षय दोन्ही भूमिकेत एकसारखाच दिसतो. जसे मागील काही वर्षात येऊन गेलेले अँक्शनपट आणि हा चित्रपट. एक रुळलेला फॉर्मूला घेऊन चित्रपट बनवल्यावर दुसरे काय होणार. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांना विश्वास आहे की, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नक्कीच गर्दी खेचेल. संजय लीला भन्साळी आणि युटीव्हीला पूर्ण विश्वास आहे की, प्रेक्षकांना असेच चित्रपट आवडतात. कदाचित हे खरं देखील आहे. मात्र प्रश्न हा आहे की, लोकांना यापेक्षा अधिक काही मिळाले तर नको आहे का ? त्यांचा अधिकार यापेक्षा अधिकचा नाही का ? मात्र 'राउडी राठोड' तिकीट वसूल चित्रपट आहे. एका हिंदी चित्रपटासाठीचा मसाला यात ठासून भरण्यात आला आहे.
-मयंक शेखर, चित्रपट समीक्षक