आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Filmfare Awards 2015: Bollywood Celebs Reached At Event

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Filmfare Awards: शाहिद ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर कंगना अभिनेत्री, बघा सोहळ्याचे Photo

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून सोनम कपूर, पत्नी डेनिअलसोबत सनी लिओन आणि एली अवराम)
मुंबई- मुंबईमध्ये शनिवारी बॉलिवूडचा लोकप्रिय फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेखा, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, वरुण धवन, रमेश सिप्पी, तापसी पन्नू, माधुरी दीक्षित नेने, मनीषा कोइराला, रिचा चढ्डा, विद्या बालन, आलिया भट्ट, काजोल, दिव्या दत्त, देबिना बॅनर्जी, सनी लिओनी, गोहर खान, नेहा धूपियासह अनेक बॉलिवूड अभिनेत्री ग्लॅमरस अवतारात पोहोचल्या होत्या.
फिल्मफेअरव्दारा बॉलिवूडमध्ये आपले उत्कृष्ट योगदान देणा-या कलाकारांना पुरस्कराने सन्मानित केले जाते. फिल्मफेअर अवॉर्डचे हे 60वे वर्ष होते. यावर्षी कोण-कोणत्या अभिनेत्री-अभिनेते आणि सिनेमा पुरस्कार मिळाला जाणून घ्या खाली दिलेल्या यादीवरून...
फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा -
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहीद कपूर (हैदर )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कंगना राणावत (क्वीन )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- के. के मेनन (हैदर )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- तब्बू (हैदर )
सर्वोत्कृष्ट गोष्ट - रजत कपूर (आखों देखी )
सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले- राजकुमार हिरानी आणि अभिजीत जोशी (पीके )
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक )- अभिषेक वर्मा (टू स्टेट्स )
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष )- फवाद खान (खुबसूरत ) सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला ) - किर्ती साना (हिरोपंती )
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक )- अभिषेक वर्मा (टू स्टेट्स )
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष )- फवाद खान (खुबसूरत )
सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला )- किर्ती सेनन (हिरोपंती )
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- शंकर एहसान लॉय (टू स्टेट्स )
सर्वोत्कृष्ट गीतकार- रश्मी सिंग- (मुस्कुराने की वजह, सिटीलाइट )
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अंकीत तिवारी (तेरी गलीया, एक व्हिलन)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर (बेबी डॉल, रागिनी एमएमएस 2)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- अहमद खान (जुम्मे की रात, किक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- अमीत त्रिवेदी (क्वीन )
सर्वोत्कृष्ट अॅक्शन- शाम कौशल (गुंडे)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- बॉबी सिंग, सिद्धार्थ दिवाण (क्वीन)
सर्वोत्कृष्ट संकलन- अभिजीत कोकाटे आणि अनुराग कश्यप (क्वीन)
सर्वोत्कृष्ट निर्मिती संकल्पना - सुब्रता चक्रबर्ती आणि अमित रे (हैदर)
सर्वोत्कृष्ट साऊण्ड- अनिलकुमार कोणकाणदल आणि प्रबळ प्रधान (मर्दानी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- डॉली आलुवालिया (हैदर)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची ग्लॅमरस छायाचित्रे...