आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Candid Moments: अवॉर्ड नाइटमध्ये तारे-तारकांनी केले एन्जॉय, खास क्षण झाले कॅमे-यात कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[सलमान खानसोबत दीपिका पादुकोण (डावीकडे), उजवीकडे मस्तीच्या मूडमध्ये रणबीर, वरुण आणि शाहिद कपूर(वर), फोटोग्राफी करताना दीपिका (खाली)]
मुंबईः रविवारी रात्री बॉलिवूडचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. खरं तर ही अवॉर्ड नाइट 31 जानेवारी रोजी मुंबईत रंगली होती. मात्र याचे प्रेक्षपण 8 फेब्रुवारी रोजी टीव्हीवर झाले. या अवॉर्ड सेरेमनीत रेखा, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, वरुण धवन, रमेश सिप्पी, तापसी पन्नू, माधुरी दीक्षित नेने, मनीषा कोइराला, ऋचा चड्ढा, विद्या बालन, आलिया भट्ट, काजोल, दिव्या दत्ता, देबिना बनर्जी, सनी लिओनी, गौहर खान, नेहा धूपिया आणि अनेक टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती.
यावेळी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सलमान खान आणि वरुण धवनसह अनेक यंगस्टर्सनी आपल्या परफॉर्मन्सेसनी सोहळ्याला चारचाँद लावले. तर शाहिद कपूरला रणबीर कपूर, सलमान खान, तब्बू, सोनम कपूर, अमिताभ बच्चन, वरुण धवन आणि अनेक स्टार्ससोबत धमाल मस्ती करताना बघितले गेले.
इतकेच नाही या अवॉर्ड नाइटमध्ये दीपिकासुद्धा हटके अंदाजात दिसली. ती येथे फोटोग्राफीच्या मूडमध्ये दिसली. शिवाय तिने विद्या बालनसोबत गॉसिपही केले. एकंदरीकच फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या नाइटमध्ये तारेतारकांचे हलकेफुलके क्षण बघायला मिळाले.
या पॅकेजमधून divyamarathi.com तुम्हाला या अवॉर्ड्स नाइट्समधील सेलिब्रिटींचे असचे हलकेफुलके क्षण दाखवत आहे.