आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Final Breath Go To Camera, Sachin Expressed His Feeling

अखेरचा क्षणही कॅमे-यासमोरच यावा, सचिनच्या भावनांनी सभागृह स्तब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘गेली 50 वर्षे मी सतत कॅमे-यालाच आपला सखासोबती मानत काम केले. तेव्हा शेवटच्या क्षणीही मला कॅमे-यासमोरच मरण यावे,’ अशा भावना अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले, तेव्हा सभागृह काही क्षण हेलावले. निमित्त होते सचिन पिळगावकर यांच्या ‘हा माझा मार्ग’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते गुरुवारी रात्री हा आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. दस्तुरखुद्द बिग बी अमिताभ बच्चन, सुलोचना दीदी, संगीतकार शंकर महादेवन् यांच्यासह मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक तारे- तारका उपस्थित होत्या. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटापासून कॅमे-याशी दोस्ती केलेल्या सचिन यांनी 50 वर्षाची कारकीर्द आत्मचरित्राद्वारे लोकांसमोर उघड केली.