आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जिस्‍म-2'मध्‍ये सनी 'दिल्‍ली गर्ल' बनून झळकणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्‍या अनेक दिवसांपासून पोर्न स्‍टार अभिनेत्री सनी लियॉन महेश्‍ा भट यांच्‍या 'जिस्‍म-2' या चित्रपटात काम करणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. पण्‍ा, नुकतेच सनीने स्‍वत: चित्रपटात काम करणार असल्‍याची अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटात ती दिल्‍लीस्थित तरूणीची भूमिका साकारणार आहे.
दिग्‍दर्शक महेश भट यांनी ट्विटरवर सनीने याबाबत दिलेल्‍या कबुलीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत सनीने महेश आणि पूजा भट यांचे गुणगान गायले आहे. 'जिस्‍म-2'मध्‍ये काम करायला मिळतेय याचा तिला खूप आनंद झाला आहे. करिअरच्‍या सुरूवातीलाच इतक्‍या दिग्‍गज मंडळींसोबत काम करण्‍याचा अनुभव भविष्‍यात नक्‍कीच कामी येईल, असेही तिने म्‍हटले आहे.
पूजा भटने याबाबत अधिक माहिती देत म्‍हटले आहे की, 'चित्रपटात सनी दिल्‍ली विद्यापीठातून उच्‍च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्‍या तरूणीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण दिल्‍ली आणि जयपूरमध्‍ये होणार आहे.'
सध्‍या पूजा व महेश या चित्रपटासाठी दोन मुख्‍य पुरूष कलाकारांच्‍या शोधात आहेत. पूजा पुढे म्‍हणाली की, 'चित्रपटात एक पंचवीशीचा तर दुसरा चाळीशीचा असे दोन मुख्‍य पुरूष कलाकार असतील. सनी सध्‍या हिंदी भाषेवर प्रभुत्‍व मिळवण्‍यासाठी तयारी करत आहे.'
पाहा महेश भट यांनी अपलोड केलेला व्हिडिओ:'जिस्‍म-2'मध्‍ये 'संभोगापासून समाधीपर्यंत'चे ओशो दर्शन
सनीच्‍या 'जिस्‍म-2'चे पोस्‍टरच इतके बोल्‍ड, मग चित्रपट कसा असेल?