आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finding Fanny And Creature 3D Release Latest News In Hindi

बॉक्स ऑफिसवर प्रमुख नायिकांचा बोलबाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणीमुखर्जीच्या ‘मर्दानी’ आणि प्रियंकाच्या ‘मेरी कोम’ पाठोपाठ दीपिकाचा ‘फाइंडिंग फॅनी’ आणि बिपाशाचा ‘क्रिएचर’ नुकतेच रिलीज झाले. टी सीरिज कंपनी आणि विक्रम भट्ट यांनी १७ कोटी रुपयांमध्ये ‘क्रिएचर’ची निर्मिती केली आहे. प्रिंट प्रचारासहित सिनेमाचा एकूण खर्च २७ कोटी रुपये इतका आहे. हिंदी सिनेमा निर्मात्यांच्या यादीमध्ये विक्रम भट्ट एकमेव असे दिग्दर्शक आहेत ज्यांना तंत्रज्ञानाचा पुरेपूर अभ्यास आहे. विक्रम यांनी पटकथा लिहिताना विशेष प्रभाव पाडणा-या दृश्यांचा अधिक बारकाईने अभ्यास करून हॉलीवूड सिनेमांत वापरण्यात येणा-या उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे या दृश्यांना अंतिम रूप दिले आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे मागील ‘राज ३’ आणि ‘हॉन्टेड’ दोन्हीही थ्रीडी सिनेमा यशस्वी ठरले. हॉरर सिनेमांचा पहिला सुखद पैलू म्हणजे मधुर संगीत. हे संगीत टी सीरिज कंपनीमुळे ‘क्रिएचर’ मध्ये प्रभावशाली ठरले आहे.
दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूरच्या ‘फाइंडिंग फॅनी’ची निर्मिती २७ कोटींमध्ये झाली आहे. मोठ्या स्टारकास्टच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे. हा एक हटके सिनेमा असल्याने बाजारातील मूल्याच्या अर्ध्या किमतीवर सिनेतारे काम करण्यास तयार झाले. ७०-८० च्या दशकातदेखील ऋषिकेश मुखर्जींचे सिनेमा करण्यासाठी सर्वच दिग्गज सिनेतारे असा डिस्काउंट देत असत. प्रिंट प्रचारासहित सिनेमाचा एकूण खर्च ३७ कोटी रुपये इतका आहे. महानगरातील युवा वर्गाच्या जोरावर सिनेमाचा हा खर्च सहजरीत्या भरून काढला जाऊ शकतो.
‘मेरी कोम’चा पहिल्या दिवशी कोटी रुपये तर आठवड्याचा व्यवसाय ४१ कोटी इतका झाला आहे. या सिनेमामुळे प्रियांकाला भरपूर फायदा होणार आहे. योगायोग म्हणजे, ‘मर्दानी’ आणि ‘मेरी कोम’च्या यशानंतर या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या दोन्ही सिनेमांत नायिकाच प्रमुख भूमिकेत आहेत.