आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक अभिजीतच्या विरोधात महिलांसोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'मै कोई ऐसा गीत गाऊ' आणि 'ये तेरी आखे झुकी- झुकी'सारखे सुपरहिट गाणे गायलेल्या गायक अभिजीत भट्टाचार्यच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. प्राण्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या एका एनजीओने आणि त्याच्या सोसायटीच्या लोकांनी महिलांविरोधात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे. एनजीओनुसार, रस्त्यावर भटकणा-या श्वानांपासून बचाव करण्यासाठी एक अभिनयान चालवत असताना अभिजीत आणि सोसायटीच्या काही सदस्यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत गैरवर्तणूक केली.
जेव्हा या प्रकरणाविषयी अभिजीतशी बातचीत केली तेव्हा त्याने सांगितले, 'हे संस्थेच्या नावावर लोकांना लुटतात. आमच्या सोसायटीच्या आसपास 18-20 श्वान भटकतात. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अचानक एनजीओची एक टीम आली आणि आम्हाला दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला तर आमच्या विरोधात त्यांनी गैरवर्तणूकीची तक्रार दाखल केली. हा केवळ एक पब्लिक स्टंट आहे बाकी काही नाही.'
असे पहिल्यांदा घडत नाहीये, की अभिजीतचे नाव वादाच अडकले आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या विरोधात अंबोली पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झाली होती. त्यामध्ये त्याच्या हॉटेलमध्ये दोन लोकांनी एका पर्यटकाच्या मुलीची छेड काढली होती. एवढेच नाही तर, त्याने शाहरुख खान आणि पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या विरोधात बोल्ड वक्तव्य करून वादग्रस्त सेलेब्समध्ये सामील झाला होता.