आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK : 'जोकर' अक्षयबरोबर झळकले एलियन्सला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाची मोस्ट अवेटेड 'जोकर' ही फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अक्षय कपूरने एनआरआयची भूमिका साकारली असून सोनाक्षी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. शिरीष कुंदरने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.एनआरआय अक्षय आपल्या पत्नीबरोबर भारतातील पगलापूर या गावात परततो. येथे आल्यावर आपल्या गावाची परिस्थिती खूपच वाईट असल्याचे त्याच्या लक्षात येते. शासनाच्या कोणत्याही योजनेचा फायदा गावात मिळत नसल्याचे त्याच्या लक्षात येते. इतकेच काय तर भारताच्या नकाशावरही गावाचा उल्लेख नसल्याचे पाहून अक्षयला मोठा धक्का बसतो. गावाला नवीन ओळख मिळवून देण्याचे अक्षय ठरवतो. संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या गावाकडे आकर्षित करण्यासाठी अक्षय एक आगळी-वेगळी योजना आखतो. गावात एलिअन्स आल्याची बातमी अक्षय पसरवतो. त्यानंतर काय गंमतीजमती घडतात हे 'जोकर' या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.३१ ऑगस्टला रिलीज होणा-या या चित्रपटाची फरहा खान निर्माती आहे.'जोकर' चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहा या व्हिडिओमध्ये...