आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look Of Alia Bhatt And Varun Dhawan Starrer Humpty Sharma Ki Dulhania

'हम्प्टी शर्मा...'चा FIRST LOOK, क्रिकेट-बॉलिवूड चाहत्याच्या भूमिकेत वरुण-आलिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकापाठोपाठ दोन हिट सिनेमांसोबत वरूण धनवने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. आलिया भट्टसुध्दा 'हायवे' आणि '2 स्टेट्स'पासून प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. आता हो दोन्ही स्टार्स 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' सिनेमामत एकत्र दिसणार आहेत. या सिनेमापासून ऑफिशिअल टि्वटर अकाउंटने फस्ट लूक सादर केला आहे.
सिनेमाच्या कहानीमध्ये वरुण धवनच्या भूमिकेचे नाव हम्टी शर्मा आहे. तो एक क्रिकेट चाहता आहे. आलिया भट्ट काव्या प्रतापचे पात्र साकारत आहे. ती करीना कपूरची चाहती आहे. हा सिनेमा चंदीगढच्या पाश्वभूमिवर आधारित प्रेमकथा आहे. सिनेमा करण जोहरने निर्मित केला असून शशांक खेतान दिग्दर्शक आहे. हा सिनेमा यावर्षी 11 जुलैला रिलीज होणार आहे.
वरुण धवनचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला तर तो यशस्वी सिनेमांची हॅट्रीक करण्यात यशस्वी होऊ शकतो. डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुणने आपल्या करिअरची सुरूवात 'स्टुडंट ऑफ द इअर'पासून केली होती. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा हिट सिनेमा होता. त्यांचा 'मै तेरा हिरो' हा दुसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. तो यावर्षीच्या हिट सिनेमांच्या यादीत सामील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सिनमाचा फस्ट लूक...