आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक व्हिलेन'च्या गाण्याचा FIRST LOOK, बघा श्रध्दा-सिध्दार्थचा रोमँटिक अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिध्दार्थ मल्होत्रा आणि श्रध्दा कपूर अभिनीत 'द व्हिलेन' सिनेमाच्या 'गलियां...' या पहिल्या गाण्याचा फस्ट लूक समोर आला आहे. हे गाणे गोवा आणि मॉरिशसमध्ये शुट करण्यात आले आहे. अंकित तिवारीने या गाण्याला आपल्या आवाजात स्वरबध्द केले आहे. अंकितसोबत श्रध्दानेसुध्दा या गाण्याला आपला आवाज दिला आहे.
या गाण्याच्या माध्यमातून श्रध्दाने गायनाच्या क्षेत्रात एंट्री केली आहे. पहिल्यांदा समोर आलेल्या या गाण्याच्या छायाचित्रांमध्ये सिध्दार्थ आणि श्रध्दा खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. श्रध्दा कपूर यापूर्वी 'आशिकी 2' 'लव्ह का द एंड' आणि 'तीन पत्ती' या सिनेमांमध्ये दिसली आहे. सिध्दार्थने 'हंसी तो फंसी' आणि 'स्टुडेंट ऑफ द इअर' या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
'एक व्हिलेन' हा एक रोमँटिक थ्रिलर सिनेमा असून मोहित सूरीने दिग्दर्शिक केले आहे. सिध्दार्थ आणि श्रध्दाव्यतिरिक्त सिनेमात रितेश देशमुखचीसुध्दा मुख्य भूमिका आहे. तो यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
'एक व्हिलेन'च्या गाण्यांना अंकित तिवारी, मिथुन आणि प्रितमने संगीत दिले आहे. एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजीच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला हा सिनेमा 27 जून रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सिध्दार्थ आणि श्रध्दा यांची 'एक व्हिलेन' सिनेमाच्या गाण्यातील खास छायाचित्रे...