आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीचा एकत्र दिग्दर्शन असलेला बारावा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे नाव आहे 'संहिता'.
मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, राजेश्वरी सचदेव, ज्योती सुभाष, उत्तरा बावकर आणि अश्विनी गिरी यांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला आहे.
'संहिता'मध्ये एका दिग्दर्शिकेची गोष्ट मांडण्यात आली आहे. आजचा काळ आणि जुना काळ अशा दोनही काळामध्ये सिनेमाचे कथानक घडते. सिनेमातील संस्थानिकांचा काळ फारसा जुना नसून स्वातंत्र्य मिळण्याच्या थोडासा आधीचा आहे.
संगीत या सिनेमाचा महत्त्वाचा भाग असून शैलेंद्र बर्वे यांनी यातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर आरती अंकलीकर यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. सिनेमातील काळ संस्थानिकांच्या काळातील असल्याने यातील रचना हिंदी आणि उर्दू भाषेत आहेत.
या सिनेमाबद्दल सांगायची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट संगीताचा आणि पार्श्वगायिकेचा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार 'संहिता' या सिनेमाच्या नावी आहे.
संजय मेमाणे या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर असून गीता गोडबोले वेषभूषाकार आहेत.
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'संहिता'ची ही पहिली झलक...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.