आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : बघा रवी जाधव यांच्या \'टाइमपास\'ची खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, आणि ‘बीपी’(बालक पालक), या धमाकेदार सुपरहिट सिनेमांनंतर दिग्दर्शक रवी जाधव प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार याची सगळ्यांनाचा उत्सुकता होती. आता ही उत्सुकता संपलीय. कारण रवी जाधव यांचा 'टीपी' अर्थातच 'टाइमपास' हा सिनेमा पुढीलवर्षी 3 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

सिनेमाच्या टायटलवरूनच रवी जाधव आता काहीतरी धमाल करणार हे दिसतंय. या सिनेमातून ते म्युझिकल लव्हस्टोरी हाताळली आहे. 16 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांची प्रेमकथा 'टाइमपास'मध्ये साकारण्यात येणार आहे. ही कथा रवी जाधव यांची असून दिग्दर्शन आणि निर्मितीसुद्धा तेच करणार आहेत. तर पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि रवी जाधव या तिघांची आहे.

या सिनेमातून ‘शाळा’ सिनेमातून लोकप्रिय ठरलेली केतकी माटेगांवकर आणि ‘बीपी’ मधला विशू म्हणजेच प्रथमेश परब हे दोघे या झळकणार आहेत. तर चिनार-महेश यांचं संगीत आहे. नुकतीच या सिनेमाची पहिली झलक रिलीज करण्यात आली आहे.

व्हिडिओवर क्लिक करा आणि बघा 'टीपी'ची ही खास झलक...