आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या न्यूड पोस्टरशी साम्य साधणारा आहे 'फुद्दू'चा First look, पाहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे, 'पीके'च्या पोस्टरवर आमिर खान, उजवीकडे 'फुद्दू'च्या पोस्टरवर शुभम)
मुंबईः बॉक्स ऑफिसवर यावर्षी रिलीज होणा-या 'फुद्दू' या आगामी सिनेमाचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचे पोस्टर आमिर खानच्या आगामी 'पीके' सिनेमाच्या पोस्टरशी साधर्म्य साधणारे आहे. 'फुद्दू' या सिनेमाचे दिग्दर्शन सुनील सुब्रमण्यम यांनी केले असून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती कपूरसुद्धा या सिनेमाद्वारे पदार्पण करत आहे.
'फुद्दू'चा फस्ट लूक...
या सिनेमाच्या फस्ट लूकमध्ये स्वाती कपूर आणि शुभम दिसत आहे. या पोस्टरवर शुभम विवस्त्र अवस्थेत दिसत आहे. त्याने हातात एक कुंडी पकडलेली आहे. तर स्वाती नाइटी परिधान करुन त्याच्या शेजारी उभी दिसत आहे. तिने शुभमचे कपडे आपल्या एका हातात पकडले आहेत.
'पीके'शी साधर्म्य साधणारा आहे फस्ट लूक...
सिनेमाचे पोस्टर आमिर खानच्या आगामी 'पीके'च्या पोस्टरशी साधर्म्य साधणारे आहे. 'पीके'च्या पहिल्या पोस्टरमध्ये आमिर न्यूड झळकला होता. केवळ फरक एवढाचा आहे, की आमिरच्या हातात ट्रान्झिस्टर होते, तर शुभमच्या हातात कुंडी आहे.
अॅडल्ट कॉमेडी सिनेमा आहे फुद्दू
'फुद्दू' हा सिनेमा दिग्दर्शित करणारे सुनील सुब्रमण्यम यांनी अनुराग बसूसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. हा एक अॅडल्ट कॉमेडी सिनेमा आहे. महिमा प्रॉडक्शनअंतर्गत हा सिनेमा तयार होतोय. राणा मजूमदार याचे संगीतकार आहेत, तर मोहित चौहान, सुनिधि चौहान, केके आणि अरिजीत हे गायक-गायिका आहेत. अनुराग बसूने या सिनेमासाठी सुनील सुब्रमण्यम यांची मदत केली आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा 'फुद्दू'चे पोस्टर...