आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: राणी मुखर्जी बनली 'मर्दानी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशराज फिल्म्सच्या आगामी 'मर्दानी' या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात राणी मुखर्जी मेन लीडमध्ये आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये राणी मुखर्जी काळ्या रंगाच्या कुर्त्यात दाराजवळ दबंग रुपात उभी दिसत आहे.
राणीच्या हातात बंदूक असून तिच्या मागे रक्तबंबाळ झालेली व्यक्ति दिसत आहे. पहिल्या नजरेत राणी पोलिस नव्हे तर दरोडेखोर दिसत आहे. खरं तर सिनेमात तिची भूमिका पोलिस ऑफिसरची असून तिचे नाव शिवानी शिवाजी रॉय असे आहे.
'मर्दानी'चे हे पोस्टर अमिताभ बच्चन यांच्या 'सरकार' या सिनेमाशी काहीसे मिळतेजुळते दिसत आहे.