हैदरचा फस्ट लूक पोस्टर
मुंबई: दिग्दर्शक आणि निर्माता विशाल भारव्दाजचा आगामी 'हैदर' सिनेमाचा फस्ट लूक काल (7 जुलै) रिलीज करण्यात आला. पोस्टर पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की सिनेमात श्रध्दा आणि शाहिद कपूर यांची केमिस्ट्री कशी असणार आहे.
हा सिनेमा व्हिल्मिअम शेक्सपिअरच्या 'हेमलेट' कादंबरीवर आधारित आहे. त्याचे शुटिंग जम्मू आणि काश्मिरमध्ये झाले आहे. सिनेमाला विशाल भारव्दाज, सिध्दार्थ रॉय कपूर आणि शाहिद कपूरने निर्मित केले आहे. स्वत: विशालने सिनेमाला संगीतही दिले आहे.
शाहिर आणि श्रध्दाव्यतिरिक्त तब्बू, के के मेनन आणि इरफान खानसुध्दा या सिनेमात झळकणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिद आणि श्रध्दा अभिनीत या सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक...