आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look Pics Of Ranveer Endorsing Condom Brand

रणवीर झळकणार कंडोमच्या जाहिरातीत, बघा FIRST LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता रणवीर सिंह सध्या बराच चर्चेत आहे. कारण तो आता एका कंडोमच्या जाहिरातीत काम करणार आहे. आतापर्यंत कोणताही स्टार्स या जाहिरातीशी जोडण्यापासून दुर राहत होता. परंतु आता रणवीरने बॉलिवूडची ही परंपरा मोडीत काढली आहे.
अलीकडेच रणवीरच्या मान्यताप्राप्त कंडोम ब्रँडची पहिली जाहिरातसुध्दा समोर आली आहे. कंडोमच्या जाहिरातीत काम करणा-या सोबतच रणवीरचे नावसुध्दा सनी लिओन, केशा, प्रिन्स आणि ड्राफ्ट पंकसारख्या स्टार्सच्या नावांमध्ये समील झाले आहे.
रणवीर सिंहचे म्हणणे आहे, 'मी मागील साडेतीन वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. यादरम्यान मला अनेक जाहिरातीच्या ऑफर मिळाल्या. परंतु मी त्यांना नकार दिला. मी आता जगातील सर्वास सेक्युअल ड्यूरेक्स ब्रँडमधून जाहिरातीच्या जगात पाऊल ठेवले आहे.'
एवढेच नाही, रणवीर पुढे म्हणतो, की सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी प्रचार करण्यात काहीच गैर नाहीये. हे सामाजिक कार्य आहे. देशातील तरुणांना सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी संदेश देणे गरजेचे आहे. याच कारणामुळे मी ही जाहिरात केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण-कोणत्या प्रसिध्द बॉलिवूड स्टार्सनी केले आहे कंडोमच्या जाहिरातीत काम?