'सिंघम रिटर्न्स'चा फस्ट लूक
मुंबई: बॉक्स ऑफिसवर अॅक्शन किंग नावाने ओळख निर्माण करणारा अजय देवगण पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अॅक्शन दाखवण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमाचा फस्ट लूक काल (6 जुलै) रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा 2011मध्ये आलेल्या 'सिंघम'चा सीक्वल आहे. दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शन रोहित शेट्टी केले आहे.
सिनेमाचा ट्रेलर अद्याप लाँच झालेला नाहीये. परंतु सिनेमा प्रति लोकांची उत्सूकता बघायला मिळत आहे. सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये अजयसह दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने काम केले होते. परंतु 'सिंघम रिटर्न्स'मध्ये
करीना कपूर अजयची नायिका आहे.
अजय आणि करीनाव्यतिरिक्त अनुपम खेर आणि अमोल गुप्तेसुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. 15 ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सिंघम रिटर्न्स'च्या फस्ट लूकची काही छायाचित्रे...