आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Marathi Superhero Film 'Baji' Poster Reveled

श्रेयस तळपदे अवतरणार पहिल्या मराठी सुपरहीरोच्या रुपात, पाहा 'बाजी'ची पहिली झलक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सुपरहीरो' हा चित्रपट प्रकार हॉलिवूड आणि पाश्चात्य जगतात खूप लोकप्रिय ठरला. कॉमिक पुस्तकांमधील अनेक सुपरहीरोंवर भव्य चित्रपट गाजले. राकेश रोशन यांनी हिंदीतही 'क्रिश' मालिकेद्वारे सुपरहीरो साकारला. आता 'बाजी' नावाचा मराठी सुपरहीरो अवतरणार आहे. 'इक्बाल' आणि 'वेलकम टू सज्जनपूर' या चित्रपटांद्वारे हिंदीत आपले पाय रोवणारा अभिनेता श्रेयस तळपदे हा 'बाजी' साकारणार आहे. या चित्रपटाद्वारे श्रेयस मराठीत पुनरागमन करत आहे.
21 जानेवारी रोजी मुंबईत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यावेळी वास्तव आयुष्यातील हीरो विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे पोस्टर रिव्हील करण्यात आले. दार मोशन पिक्चर्स, सुहृद गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आय आणि निखिल महाजन यांची ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स अशा तीन चित्रपट संस्थांच्या वतीने 'बाजी' चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात बाजीच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि त्याच्या नायिकेच्या भूमिकेत मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन 'पुणे 52'द्वारे मराठीत पदार्पण करणारे निखिल महाजन करणार आहेत. कोकणातल्या नयनरम्य लोकेशन्सवर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
अॅक्शन अॅडव्हेन्चर-रोमान्सचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरची पहिली झलक आणि कार्यक्रमाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...