आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Song Of Bollywood Actor Amitabh Bachchan Starrer Shamitabh

'शमिताभ'चे पहिले गाणे :Toilet Singer बनले बिग बी, पाहा Video+Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओवर क्लिक करुन पाहा 'पिंडली' या गाण्याचा व्हिडिओ)
मुंबई: अमिताभ बच्चन यांचा आगामी 'शमिताभ' या सिनेमातील पहिले गाणे 'पिंडली' रिलीज झाले आहे. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणे गाताना दिसतात.
हे गाणे स्वत: अमिताभ बच्चन यांनी गायले आहे.. गाण्याचं शूट कोणत्याही स्पेशल सेटवर नाही तर चक्क टॉयलेटमध्ये केले गेले. गाण्यात बिग बी टॉयलेट पेपर ओढतांना आणि म्यूझिक एन्जॉय करताना दिसतात.
अमिताभ लिरिक्स वाचत 'पिंडली' गाणे गाताना खूप वेगळे दिसतात. या गाण्याला संगीत इल्लय राजा यांचे असून गीताचे बोल मराठमोळे गीतकार स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर हे गाणे आपल्या फॅन्ससाठी शेअर केले आहे.
'शमिताभ' हा सिनेमा आर. बाल्की दिग्दर्शित करत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह धनुष, अक्षरा हसन आणि रेखा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 6 फेब्रुवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पिंडली' या गाण्यातील बिग बींची खास छायाचित्रे...