आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time Yo Yo Honey Singh Has Introduce His Wife

Love of Yo Yo: हनी सिंगने पहिल्यांदाच पत्नीला आणले कॅमे-यासमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी शालिनीसह हनी सिंग)
मुंबई - हनी सिंगला आजवर आपण रॅपिंग, सिंगिंग आणि डान्स करताना पाहिले आहे. मात्र यंदा हनी सिंगचे एक वेगळेच रुप 'इंडियाज रॉ स्टार' या शोच्या शूटवेळी उपस्थितांना पाहायला मिळाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हनी सिंगचा 'देसी कलाकार' हा नवीन अल्बम 'इंडियाज रॉ स्टार'च्या शूटच्या दुस-या दिवशी रिलीज होणार होता. त्यामुळे हनी खूप नर्व्हस होता. त्याच्या नर्व्हसनेसमुळे शोचे शूटिंग तब्बल चार तास उशीराने सुरु झाले. यादरम्यान तो सतत फोनवर बोलत होता.
थोड्या वेळाने तो आपली बॅग उचलून बाहेर कुणाची तरी वाट पाहू लागला. तेथे एक कार आली आणि त्यातून एक मुलगी बाहेर आली. ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून हनीची पत्नी शालिनी होती. शालिनीने हनीला शांत केले. तेव्हा कुठे हनीने शूटला सुरुवात केली. शूटिंग सुरु झाल्यानंतर हनीने आपल्या पत्नीला स्टेजवर बोलावले आणि सर्वांना तिची ओळख करुन दिली. पहिल्यांदाच हनीची पत्नी कॅमे-यासमोर आली होती. शालिनीचे त्याच्या आयुष्यातील महत्त्व यावेळी हनीने सांगितले.
लग्नावरुन कायम ठेवला होता सस्पेन्स...
हनी सिंगचे लग्न नेहमीपासून वादात राहिले. 2011 मध्ये हनी सिंगच्या लग्नाचे वृत्त आले होते. त्यावेळी त्याच्या लग्नाची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली होती. मात्र ही छायाचित्रे बनावट असल्याचे हनीने त्यावेळी म्हटले होते. कालांतराने हनीने लग्न झाल्याचे कबूल केले होते. मात्र त्यावेळी त्याने आपल्या पत्नीच्या नावाचा खुलासा केला नव्हता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इंटरनेटवर व्हायरल झालेली हनी सिंगच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...