('फितूर'साठी किस सीन शूट करताना कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या श्रीनगर येथे आहे. आगामी 'फितूर' या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने ती येथे आली आहे. अलीकडेच अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत तिने सिनेमातील एका किसींग सीनचे शूटिंग पूर्ण केले. या सीननुसार, कतरिना कैफ एका ब्रिजवर जाताना दिसते. तिथे तिची भेट आदित्य रॉय कपूरसोबत होते. येथे हे दोघे एकमेकांना किस करतात.
याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान काही दिवसांपूर्वी कतरिना व्हाइट ड्रेसमध्ये कॅमे-यात कैद झाली होती. हा दृश्य अभिनेत्री रेखाने साकारलेल्या पात्राच्या अंत्ययात्रेचे होते. शुक्रवारी हे दृश्य श्रीनगर येथील निशात बाग येथे शूट करण्यात आले. बागमध्ये कार नेण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे कलाकारांना पायी चित्रीकरणस्थळी जावे लागले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि सीआरपीएफचे जवान त्यांच्यासोबत होते.
'फितूर' हा सिनेमा अभिषेक कपूर दिग्दर्शित करत असून आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ, रेखा, अदिती राव हैदरी, राहुल भट्ट आणि अक्षय ओबरॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. याशिवाय
अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. यावर्षी 25 डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा श्रीनगर येथे 'फितूर'च्या शूटिंगवेळी क्लिक झालेली कतरिनाची छायाचित्रे...