आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फितूर'च्या शूटिंगचे PHOTOS झाले लीक, लाल विगमध्ये दिसली रेखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फितूर' सिनेमातील रेखाचा गेटअप आणि लोकेशन)
मुंबईः 'फितूर' या आगामी हिंदी सिनेमाची काही छायाचित्रे इंटरनेटवर लीक झाली आहेत. ही छायाचित्रे श्रीनगर येथे झालेल्या शूटिंगची आहेत. यामध्ये अभिनेत्री रेखाचा वेगळा लूक दिसतोय. वरील छायाचित्र बघून रेखा यांनी बरगंडी कलरचा विग घातला असल्याचे लक्षात येते. तर इतर दोन छायाचित्रांमध्ये श्रीनगरमधील सुंदर लोकेशन्स दिसत आहेत.
अभिषेक कपूर दिग्दर्शित हा सिनेमा चार्ल्स डिकेंस यांच्या द ग्रेट एक्सपेक्टेशन्स या कादंबरीवर आधारीत आहे. चित्रकार असलेल्या नूरचे (आदित्य रॉय कपूर) फिरदौस (कतरिना कैफ) या तरुणीवर प्रेम असते. या सिनेमात रेखा यांनी श्रीमंत बेगमची भूमिका साकारली आहे. आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ आणि रेखा यांच्याव्यतिरिक्त आदिती राव हैदरी आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. पुढील वर्षी ख्रिसमसमध्ये हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'फितूर' या सिनेमाच्या सेटची कतरिना कैफने शेअर केलेली छायाचित्रे...