मुंबई: रणबीर कपूर आणि कतरिना कैफला अनेक ठिकाणी अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. मात्र दोघांनी सार्वजनिकरित्या आपल्या नात्याचा कधीच स्वीकार केला नाही. काही महिन्यांपूर्वी दक्षिण अफ्रिकेमधील एका बीचवर एकत्र वेळ घालवताना दोघांची खासगी छायाचित्रे लीक झाली होती. त्यानंतर ही जोडी चर्चेत आली. त्यानंतर अलीकडेच रणबीर कपूर मुंबईमध्ये कतरिना कैफसह स्थायिक होण्यासाठी एका अशियानाच्या शोधात आहे.
अनेकवेळा या जोडीच्या नात्याविषयी बॉलिवूडमध्ये चर्चा रंगल्या. तरीदेखील दोघांपैकी कोणीही याविषयी स्पष्टपणे बोलले नाही. या रिपोर्टच्या माध्यमातून असे पाच प्रश्न तुम्हाला सांगत आहोत ज्याचे रणबीरने स्वत:चा बचाव करत उत्तरे दिलीत.
पहिला:
अलीकडेच रणबीर एका स्कुटीच्या पत्रकार परिषदेत सामील झाला होता. रणबीरने या कार्यक्रमात माध्यमांना खूपच चंचलपणे उत्तरे दिलीत आणि स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. एका प्रतिनिधीने जेव्हा रणबीरला विचारले, की कतरिनासोबत बाईक राइडवर जाणे पसंत करशील का? त्यावर रणबीर म्हणाला, 'का नाही. मलाच काय कोणालाही आवडेल.'
दुसरा:
कतरिना कैफसह शिफ्ट होण्याच्या गोष्टीवर रणबीरने त्याच्या फ्लॅटमॅट्सला सांगितले, 'मला वाटते, की ही खासगी गोष्ट आहे. मला त्यावर काही कमेन्ट न करणेच योग्य.' रणबीरच्या कृष्णाकुंज बंगाल्याचे पुर्णबांधणी चालू आहे. यावर्षी पर्यंत सर्व काम पूर्ण होणार आहे. कदाचित रणबीर आई-वडिलांसह नवीन अपार्टमेन्टमध्ये शिफ्ट होऊ शकतो.
तिसरा:
एका कार्यक्रमामध्ये एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसोबत काम करण्याच्या प्रश्नावर रणबीरने मोठ्या चतुराईने दिग्दर्शक इम्तियाज अलीचे नाव पुढे करून प्रश्नाला दुर्लक्षित केले. तो म्हणाला, 'इम्तियाज माझा आवडता दिग्दर्शक आहे आणि त्याच्या सिनेमाचे शुटिंग जुलैपर्यंत सुरू होईल. 30 दिवसांच्या शुटिंग शेड्यूलसाठी सिनेमाची टीम क्रोशियाला रवाना होणार आहे.'
चौथा:
दक्षिण अफ्रिकेच्या एका बीचवर गर्लफ्रेंड कतरिना कैफसह कॅमे-यात कैद झालेल्या रणबीरला याविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, 'आम्ही स्टार्स आहोत, आम्ही जिथे तिथे कॅमे-यात कैद होतो. त्यावेळी आम्ही एका सिनेमाचे शुटिंग करत होतो.'
पाचवा:
रणबीरने कतरिनाविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी माध्यमाच्या प्रतिनिधींना शांत बसण्यास सांगितले होते, 'तुम्ही माझ्या आयुष्याला एखाद्या डेली सोपप्रमाणे बनवले आहे.' एक अभिनेता म्हणून त्याच्या कामाची चर्चा व्हायला हवी, मात्र माध्यमांना त्याच्या खासगी आयुष्याविषयी सर्वाधिक रुची असते. त्याच्याविषयी माध्यमांकडे गॉसिपव्यतिरिक्त काहीही नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेव्हा-जेव्हा रणबीर-कतरिनाला स्पॉट करण्यात आले त्यावेळची 8 छायाचित्रे...