आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅक्मे फॅशन वीकची धूम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅशन इंडस्ट्रीत महत्त्वाचा समजला जाणा-या लॅक्मे फॅशन वीकची घोषणा नुकतीच करण्यात आली. यंदाचा विंटर लॅक्मे फॅशन वीक ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. तब्बल पाच दिवस चालणा- या फॅशन वीकमध्ये यंदाही विविध प्रकारचे फॅशनचे फंडे पाहायला मिळणार आहेत.
लॅक्मे फॅशन वीकचे यंदाचे हे १३वे वर्षे आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशन जगतातले तब्बल ८६ फॅशन डिझायनर आपले कलेक्शन सादर करणार आहेत. नावाजलेल्या फॅशन डिझायनर्सबरोबर कल्लोल दत्ता, पंकज आणि निधी या नवोदित फॅशन डिझायनर्सनाही आपले कलेक्शन सादर करण्याची संधी मिळाली आहे. यावर्षीच्या लॅक्मे फॅशन वीकचे वैशिष्ट्य म्हणजे फॅशन जगतात ४० वर्षांहून अधिक काळ काम करणा-या पल्लवी जयकिशनही सहभागी होणार आहेत. शिवाय नीता लुल्ला, अनीता डोंग्रे, कृष्णा मेहता आणि रितु बेरी या फॅशन जगतातील नावाजलेल्या डिझायनर्सचाही सहभाग असणार आहे.
यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये वेंडेल रॉड्रिक्स 'द ग्रीन रुम' नावाने आपल्या मॅजिक मेमोरिस रिलीज करणार आहेत.
यासोबतच भारतीय पहेरावांचे उत्कृष्ट कलेक्शन सादर करणा-या डिझायनरला यंदा पुरस्कारही देण्यात येणार आहे.
एकंदरीतच मुंबईतील ग्रॅण्ड हयातमध्ये रंगणारा लॅक्मे फॅशन वीक बॉलिवूड कलाकार, मॉडेल्स आणि नावाजलेल्या फॅशन डिझायनर्सच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे यंदाही गाजेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये मलायका-अमृताचा जलवा (फोटो फिचर )