आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flyboard Water Jet Pack Use In Hrithik Roshan Film Bang Bang

हा स्टंट करताना हृतिकला झाली होती ब्रेन इंज्युरी, जाणून घ्या काय असते 'फ्लाय बोर्ड वॉटर जेट पॅक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकप्रियो (Leonardo DiCaprio) फ्लाय बोर्ड वॉटर जेट पॅकने उडण्याची मजा घेताना... इनसेटमध्ये हृतिक रोशन.)
बॉलिवूड स्टार हृतिक रोशन स्टारर 'बँग बँग' या सिनेमाचा टीझर मंगळवारी युट्यूबवर रिलीज करण्यात आला. यामध्ये हृतिक थरारक स्टंट करताना दिसतोय. आजपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये कोणत्याच कलावंताने हा शॉट करण्याचे धाडस दाखवले नव्हते. मात्र, हृतिकने प्रशिक्षण घेत 'बॅँग बॅँग'मधील फ्लायबॉय वॉटर स्पोर्ट अँक्शन स्टंट केला आहे.
1.4 मिनिटांच्या या टीझरमध्ये हृतिक डर्ट बाइक, वॉटर जेट पॅक आणि फॉर्म्युला वन कारने स्टंट करताना दिसतोय. पाण्यात उडताना गोळीबार करणे असो, फॉर्म्युला वन कार चालवणे असो, किंवा बाइक जंप करणे असो, असे अनेक चित्तथरारक स्टंट करताना हृतिक या सिनेमात दिसणार आहे. बॉलिवूडचा हा पहिला असा सिनेमा आहे, ज्यामध्ये वॉटर जेट पॅकचा वापर करण्यात आला आहे.
टीझरमध्ये पाण्यात उडतानाचे सीन प्रामुख्याने दाखवण्यात आले आहेच. यामध्ये हृतिक समुद्राच्या पाण्याच्या आतून बाहेर निघत काही फुट उंचावर हवेत उडताना दिसतोय. त्याने बुटाच्याखाली फ्लाय बोर्ड वॉटर जेट पॅक घातले आहेत. वॉटर जेट पॅक दोन प्रकारचे असतात. एक बॅक पाठीवर बांधण्यात येते, तर दुसरे बुटाखाली घालता येऊ शकते.
फ्लाय बोर्ड वॉटर जेट पॅकने स्टंट करताना हृतिक झाला होता जखमी...
बॅँग बॅँग'मध्ये पाण्यात उडणाच्या एका दृश्यामध्ये हृतिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे कित्येक महिने तो शूटिंग करू शकला नव्हता. ते दृश्य फ्लायबॉय वॉटर स्पोर्टचे होते. अशाच एका स्टंट शूटिंगदरम्यान हृतिकला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ब्रेन सर्जरी करून घ्यावी लागली होती. त्यामुळे त्याला 'शुद्धी' आणि 'पानी'सारख्या महत्त्वाच्या चित्रपटांवरही पाणी सोडावे लागले. या दरम्यानच सुझानाशी त्याचे नाते संपुष्टात आले. इतके नुकसान होऊनदेखील हृतिकने 'बॅँग बॅँग'मध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावत प्रत्येक स्टंट स्वत: केला. यातील सर्वाधिक धोकादायक असणारा स्टंट होता. तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतरच हे स्टंट दृश्य करण्यात येते. हृतिकने या मशीनसोबत अनेक स्टंट दृश्ये केली.
या साहसी खेळाचे प्रशिक्षण घेणारा हृतिक जगातील आठवा व्यक्ती असल्याचे बोलले जाते. ही स्टंट दृश्ये करताना डोक्याला मोठी दुखापत झाल्याने हृतिकला आठ महिने विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, दोनच महिन्यांत त्याने व्यायाम सुरू करत दिल्ली, शिमला येथे या स्टंट दृश्यांचे शूटिंग पूर्ण केले.
कसे काम करते वॉटर जेट पॅक...
वॉटर जेट पॅक घालून मनुष्य पाण्यात काही उंचावर हवेत उडू शकतो. हवेत उडण्यासाठी वॉटर जेट पॅक पाण्याबाहेर काम करतो. एका पाइपाने पाणी वॉटर जेट पॅक पंपपर्यंत पोहोचतं. पंप पाण्याच्या दोन नोझलच्या साहाय्याने वेगाने बाहेर येतं. जेट पॅकचे डिझाइन असे असते, की ज्यामुळे बाहेर पडणारे पाणी खालच्या बाजुने पडतं. यामध्ये पायाला बांधलेली मशीन वेगाने पाण्याचे प्रेशर मागे टाकत माणसाला पुढे ढकलून त्याला आकाशात उडवते.
कॅनडातील रेमंड ली या इंजिनिअरने बनवले वॉटर जेट पॅक...
वॉटर जेट पॅक हे कॅनडातील रेमंड ली नावाच्या एका इंजिनिअरने बनवले आहे. हे जेट पॅक घालून मनुष्य हवेत 30 मीटर उंचापर्यंत आकाशात उडू शकतो. याची क्षमता 35 किलोमीटर प्रतितास असते. रेमंड ली यांनी बनवलेल्या या हायटेक मशीनची किंमत 110,000 पाउंड (1.12 कोटी रुपये) इतकी आहे.
रेमंड ली यांची JETLEV-FLYER ही कंपनी हे जेट पॅक भाड्यानेसुद्धा देते. कॅरेबिअन देश, सॅन फ्रान्सिस्कोच्या समुद्रकिना-यावर वॉटर स्पोर्ट्सची सेवा देणा-या काही कंपन्यांनी हे जेट पॅक खरेदी केले आहे, तर काहींनी भाड्यावर घेतले आहे. येथे पर्यटक या मशीनच्या सहाय्याने हवेत उडण्याची मजा लुटू शकतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा खास छायाचित्रे आणि व्हिडिओ...