आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Encounter Specialist Sachin Waze Slaps RS 5 Crore Of Compensation On Riteish Deshmukh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनकाउंटर स्पेशिल‍िस्ट वझेंची रितेश देशमुखकडे 5 कोटींची नुकसान भरपाईची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी इनकाउंटर स्पे‍शलिस्ट सचिन वझे यांनी रितेश देशमुखकडे 5 कोटी रूपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.र‍ितेशची भूमिका असलेला 'लय भारी 'या मराठी चित्रपटाने ट्रेडमार्कचे उल्लंघन केले आहे. ट्रेकमार्कचे हक्क सचिन वझे यांच्याकडे आहे.
रितेश देशमुख आणि चित्रपटातील इतर सदस्यांना कायदेशीर नोटीसा बजावण्‍यात आल्या आहेत. प्रदर्शित होऊ घातलेला चित्रपट'लय भारी'चे प्रदर्शन रोखण्‍याचे आदेश नोटीसमध्‍ये बजावण्‍यात आले आहे. तसेच त्यात 5 कोटी रूपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्‍यात आली आहे.

सचिन वझे हे माजी इनकाउंटर स्पेशिलिस्ट होते. 'लय भारी' ची व्यावसायिक हक्क वझे ((Lai Bhaari, LaiBhaari, laibhaari.com तसेच लई भारी.कॉम)यांच्याकडे www.laibhaari.com नावाने आहे. laibhaari.com ही मराठी सोशल नेटवर्किंग साइट आहे.लय भारीचे ट्रेडमार्क 2010 पासून माझ्याकडे असल्याचे सचिन वझे यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले. ट्रेडमार्कच्या भंगाविषयी निर्मिता अमेय खोपकर आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या लक्षात आणून दिले होते. पण त्याकडे सं‍बंधितांनी दुर्लक्ष केल्याने कायदेशीर नोटीसा चित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्वांना बजावण्‍यात आले. नोटीसा संदर्भात 25 जूनपर्यंत उत्तर मिळणे अपेक्षित आहे.