आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी जगतसुंदरी युक्ता मुखीचा अखेर प्रिन्स तुलीशी घटस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्ता मुखी आणि प्रिन्स तुली
मुंबई: माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखी आणि प्रिन्स तुली यांचा अखेर घटस्फोट झाला. बॉम्बे हायकोर्टाने मंगळवारी (25 जून) युक्ता मुखीची याचिका रद्द केली. युक्ताने प्रिन्सच्या विरोधात कौंटुबिक हिंसेचा खटला दाखल केला होता. प्रिन्स तुलीचे वकिल फिल्जी फ्रेडरिक यांनी सांगितले, की वांद्रा कौंटुबिक कोर्टात युक्ता मुखी आणि प्रिन्स तुली यांच्या आपसी सहमतीने घटस्फोट झाला आहे.
प्रिन्स तुलीचे वकिल फिल्जी फ्रेडरिक यांनी असेही सांगितले, की तुलीने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करून युक्ता मुखीव्दारा दाखल केलेल्या तक्रारीला रद्द केले आहे. या याचिकेमध्ये युक्ताने तुलीवर अनैसर्गिक लैंगिग संबंध आणि धमकी देण्याचे आरोप लावले होते. त्यांनी असेही सांगितले, की युक्ता मुखीच्या याचिकेवर सुनावणी करताना जस्टिस व्ही.एम. कनाडे आणि पी.डी कोडे यांनी निर्णय देऊन ही याचिका रद्द केली.
कोर्टातून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांना अटी आणि मुदत मान्य होती. घटस्फोटानंतर युक्ता कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची मागणी करणार नाही ही अट दोघांना मान्य होती. तसेच तुलीला मुलाची कस्टडी न घेण्याची अट मान्य होती. हायकोर्टाने गेल्या वर्षी दोघांमधील वाद मिटण्यासाठी एका मध्यस्तीची निवड केली होती. मात्र दोघांना एकत्र आणण्यात मध्यस्ती अपयशी ठरला. त्यामुळे आता दोघांनी आपसात या वादावर तोडगा काढून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काय आहे प्रकरण... बॉलिवूडशी युक्ता मुखीचे नाते..कशी झाली प्रिन्स तुलीशी भेट...