आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Movie Selection Of Oscar, Comment By Director Anurag Basu

‘ऑस्कर’साठी चार चित्रपट निवडावेत, ‘बर्फी’फेम अनुराग बासूंची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘भारत हा चित्रपटांच्या बाबतीतही वैविध्याने समृद्ध आहे. अलीकडे निर्माण हा येणार्‍या विविध प्रदेशांतील दर्जेदार चित्रपटांचे प्रमाण पाहता ऑस्करसाठी केवळ एक चित्रपट भारताकडून पाठवला गेला तर कित्येक चांगल्या चित्रपटांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे दक्षिणेतून, महाराष्ट्रातून, उत्तरेतून आणि बंगाल- नॉर्थ-ईस्ट अशा भागांमधून चार चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेकरिता पाठवायला हवेत,’ अशी अपेक्षा ‘बर्फी’फेम दिग्दर्शक अनुराग बासू यांनी व्यक्त केली.

पाच डिसेंबर रोजी ‘कँडल मार्च’ या प्रदर्शित होणार्‍या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरणाचा कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमानंतर त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बातचीत केली. ‘बर्फी या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी झाली होती, मात्र त्या वेळीही भारतात अनेक चांगले चित्रपट होते, त्याकडे दुर्लक्ष झाले. माझ्या चित्रपटांबरोबर तेदेखील ऑस्करसाठी जाण्यास पात्र होते. आपल्याकडील प्रादेशिक चित्रपटांची समृद्धता लक्षात घेता केवळ एक चित्रपट हा निकष अपुरा ठरतो,’ असेही बासू म्हणाले.
‘बर्फी’वर टीका अन् यशही
भिलई येथून (छत्तीसगड) आलेले बासू चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून उतरले. ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’सारख्या मालिका केल्या. नंतर ‘लाइफ इन अ मेट्रो’सारखे काही चित्रपटही त्यांनी केले. ‘बर्फी’ या त्यांच्या चित्रपटावर चार्ली चॅप्लिनची नक्कल केल्याचीही टीका झाली होती, पण तरीदेखील रंजक कथेमुळे तसेच नायक रणबीरच्या निरागस भूमिकेमुळे व प्रियंका चोप्राच्या अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ‘सेटवर आपण अत्यंत तापट स्वभावाचे असलो तरी माझे चित्रपट क्षेत्राविषयीचे पॅशन सर्वच कलाकार समजून घेतात व चित्रपट जुळून येतो,’ असे आपल्या स्वभावाबद्दल सांगताना यशाचे रहस्यही बासू यांनी उलगडले.